Manoj Kumar यांची अखेरच्या क्षणी कशी होती अवस्था, कोणाशी साधला शेवटचा संवाद? मुलगा म्हणाला…

Manoj Kumar: ‘जिंदगी एक पहेली है, कभी दुश्मन कभी सहेली है…’, आपल्या सिनेमांमधून अनेकांना जगण्याची नवी उमेद देणारे दिग्गज अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. भारत कुमार या नावाने प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते मनोज कुमार यांना 4 एप्रिल 2025 रोजी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात मनोज कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरु असताना मनोज कुमार यांचं निधन झालं. शेवटच्या क्षणी त्यांची अवस्था कशी होती आणि शेवटचा संवाद त्यांनी कोणासोबत साधला… याबद्दल मनोज कुमार यांचे पूत्र कुणाल गोस्वामी यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल गोस्वामी म्हणाले, ‘माझे वडील मनोज गोस्वामी यांचं निधन झालं आहे. आज मध्यरात्री 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ होते. पण त्यांनी मोठ्या जिद्दीने सर्व गोष्टींचा सामना केला आणि त्यांच्यासोबत देवाचे आशीर्वाद आहेत. शिर्डीच्या बाबांची कृपा आहे, म्हणून त्यांनी जगाचा निरोप घेतला.’
हे सुद्धा वाचा – ओसामा बिन लादेनच्या हत्येची जागा आणि ‘त्या’ जागेसोबत मनोज कुमार यांचं खास कनेक्शन
‘शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होती. दोन महिन्यांनंतर त्यांचा 88 वा वाढदिवस होता. पण वयाच्या 87 व्या वर्षी ते स्वर्गवासी झाले. शेवटच्या क्षणी त्यांनी सर्वांसोबत संवाद साधला. पण नातवंड आणि घरातील लहान मुलांसोबत त्यांनी अधिक वेळ व्यतीत केला. शेवटच्या क्षणी देखील आनंदी होते पण वेदना असह्य्य होत्या…’ अशी माहिती मनोज कुमार यांच्या मुलाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुपरस्टार मनोज कुमार यांच्यावर शनिवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी मुंबईतील पवन हंस येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोज कुमार यांचं पार्थिव शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी गोस्वामी टॉवर्स येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
मनोज कुमार यांच्या निधनानंत बॉलिवूड विश्वाला मोठा धक्का बसला आहे. तर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘उपकार’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘पूरब पश्चिम’, ‘हरियाली और रास्ता’, ‘दस नंबरी’, ‘क्रांती’ यांसारख्या अनेक सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत मनोज कुमार यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List