पश्चिम रेल्वेवर आज, उद्या मेगाब्लॉक; 344 लोकल रद्द
पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे तब्बल 344 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची दोन दिवस मोठी गैरसोय होणार आहे. माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान असलेल्या पुलाच्या रि-गर्डरिंगचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर 11 एप्रिलच्या रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 8.30 वाजेपर्यंत धीम्या लाईन्सवर ब्लॉक असेल. तसेच डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री 12.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर 12 एप्रिलला रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या तसेच डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच रात्री 11.30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रात्रीबरोबरच विशेषतः शनिवारी आणि रविवारी सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. या कालावधीत पर्यायी मार्गाने प्रवास करून गैरसोय टाळा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List