मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणले; NIA घेणार ताबा

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणले; NIA घेणार ताबा

26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला घेऊन अमेरिकेतून विशेष विमान नवी दिल्ली विमानतळवार दाखल झाले आहे. राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याचा त्याचा अर्ज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला हिंदुस्थानात आणण्यात आले. NIA तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत दिल्लीत आणले आहे.

हिंदुस्थानात आणल्यानंतर पथक त्याचा ताबा घेणार असून त्याला NIA च्या मुख्यालयात नेणार येणार आहे. तिथे त्याची चौकशी होणार आहे. त्यानंतर त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात येणार आहे. एनआयएने मुंबई हल्ल्यावरील खटला मुंबईहून दिल्लीत ट्रान्सफर करून घेतला होता. त्यामुळे आता या खटल्याची संपूर्ण सुनावणी दिल्लीत होणार आहे. राणा हा लश्कर ए तोयबाचा दहशतवादी असून मुंबईवरील हल्ल्यापूर्वी येथील संभाव्य लक्ष्यांची टेहाळणी करण्याची जबाबदारी डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद सैयद गिलानीवर सोपवण्यात आली होती. हेडलीचा मुंबई दौरा व्यावसायिक कामासाठी दाखवण्यात आला. राणाचा इमिग्रेशन व्यवसाय होता. त्याचाच आधार घेत त्याच्या कंपनीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभारण्यात आले. त्याच कामासाठी हेडली मुंबईत यायचा. त्याने इमिग्रेशन सेंटरचा कर्मचारी म्हणून व्हिजिटिंग कार्डेही छापली होती, पण सुरक्षा यंत्रणांच्या तपासात या इमिग्रेशन सेंटरमध्ये इमिग्रेशन, व्हिसा किंवा इतर कोणतेही काम झाल्याचे आढळले नाही. एनआयएने याप्रकरणी 25 डिसेंबर 2011 रोजी आरोपपत्र दाखल केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Nirupam :  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले? Sanjay Nirupam : ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?
“तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा आहे. कारण असं आहे की,...
हे तर पडद्यामागचे राजकारण…हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी धु धु धुतले; कशासाठी घेतला निर्णय, दिले हे कारण
‘भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’; अनुराग कश्यप का भडकला?
3 दिवस कुजत राहिला काजोलच्या आजीचा मृतदेह, वयाच्या 84 व्या वर्षी हृदयद्रावक अंत
इतर महिलांकडे पाहिल्यावर आकर्षित होता का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रामाणिक उत्तर
सूडबुद्धीने निलंबित केलेल्या शिक्षक गिरीश फोंडेंवरील कारवाई मागे घ्या, कोल्हापूर महापालिकेवर शिक्षकांचा मोर्चा मूक मोर्चा
महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार मराठीच! ही आमची राजभाषा, इथे मराठीच चालणार; संजय राऊत यांनी ठणकावले