जेष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी जेष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत पुरस्कारासाठी नावाची घोषणा केली. राम सुतार यांचं वय 100 वर्षे आहे. आजही ते शिल्प तयार करतात, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
जेष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा pic.twitter.com/IGQN3L9B9l
— Saamana Online (@SaamanaOnline) March 20, 2025
राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. गेल्या चाळीस वर्षांत त्यांनी 50 हून अधिक शिल्पं तयार केली आहेत. दरम्यान, 1999 मध्ये त्यांना पद्मश्री आणि 2016 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List