असं काय घडलं? 22 वर्षे तो महिला बनून वावरत राहिला! भावुक करणारी एक कहाणी
सोशल मीडियावर रोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. डिजिटल तंत्रज्ञानामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील घटना सोशल मीडियावरून आपल्याला समजतात. अशीच एका व्यकीची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर अमेरिकेच्या डोमिनिकन गणराज्यमधील एक व्यक्ती गेली 22 वर्षे महिला म्हणून समाजात वावरत आहे. लहानपणी झालेल्या एका घटनेमुळे त्यांना तब्बल 22 वर्षे महिला म्हणून जीवन जगावं लागलं. याबाबत स्वत: त्या व्यक्तीने एका रेडिओ चॅनलवर आपला प्रवास सांगितला आहे.
फ्रैंक टैवरेस असे त्या व्यक्तीचे नाव असून तो ‘नन-मैन’ या नावाने ओळखला जातो. फ्रैंक टैवरेसने पुरुष असूनही तब्बल 22 वर्षे महिला म्हणून वावरला. लहानपणी अनुभवलेल्या एका वाईट घटनेमुळे त्याला हे पाऊल उचलावे लागले होते, असे त्याने सांगितले. फ्रैंक टैवरेस चार वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. त्यात घरची आर्थिक परिस्थितीही हालाकीची होती. अशातच आजी-आजोबांचे देखील वय झाल्यामुळे तेही सांभाळू शकत नव्हते. यामुळे त्याला डॉमिनिकन नन्स (सिस्टरच्या)देखरेखीखाली एका कॉन्व्हेंटमध्ये ठेवण्यात आले.
फ्रँक लहानपणापासूनच या नन्ससोबत राहिला. त्यामुळे त्याला मुलींचे कपडे घालावे लागत होते. फ्रँक चार वर्षांचा असल्यापासून तो मुलींचे कपडे परिधान करत होता. त्यामुळे फ्रँक सात वर्षांचा होईपर्यंत त्याला आपण मुलगी नसून मुलगा आहोत याची जाणीव नव्हती. मात्र, जेव्हा फ्रँकला स्त्री आणि पुरुषातील फरक समजायला लागला तेव्हा त्याने समाजाच्या भीतीने आपली खरी ओळख लपवण्याचे ठरवले. यानंतर तो सिस्टर मार्गारीटा म्हणून कॉन्व्हेंटमध्ये राहू लागला.
महत्त्वाचे म्हणजे फ्रँक जरी मुलीच्या वेशात वावरत असला तरी तो एक पुरुष होता. त्यामुळे वयात अल्यावर त्याला मुलींच्या प्रति भावना निर्माण होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे हळूहळू तो त्याला कॉन्व्हेंटमधील सिस्टरवर आकर्षण होऊ लागलं होतं. त्यामुळे त्याला दुसऱ्या कॉन्व्हेंटमध्ये पाठवण्यात आले. तिथे त्याला सिल्विया नावाच्या एका सिस्टरसोबत प्रेम झालं. फ्रँक महिला नसून पुरुष आहे हे सिल्वियाला समजले होते. त्यांच्या या प्रेमसंबंधामधून सिल्विया प्रेग्नेंट राहिली. त्यानंतर तिने फ्रँकला कॉन्व्हेंट सोडून स्वतःचे कुटुंब सुरू करण्यास सांगितले. परंतु फ्रँकने याला नकार दिला. त्यामुळे त्या दोघांनीही एकमेकांसोबत न राहण्याचे ठरवले. यानंतर सिल्विया त्यांचा बाळाला घेऊन अमेरिकेला निघून गेली ती पुन्हा आलीच नाही.
दरम्यान, फ्रँक स्त्री नसून पुरूष आहे याचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा कॉन्व्हेंटमधील लोकांना फ्रँकची प्रेमपत्रे सापडली. फ्रँक सिल्वियासाठी पत्र लिहायचा. या पत्रात त्याचे नावही होते. यामुळे फ्रँक पुरुष असल्याचे कॉन्व्हेंटमध्ये सगळ्यांना समजले. तब्बल 22 वर्षांचा होईपर्यंत एक स्त्री म्हणून राहणाऱ्या फ्रँकला शेवटी कॉन्व्हेंट सोडून जावे लागले. कॉन्व्हेंटमध्ये असताना तो शिवणकाम शिकला होता, म्हणून त्याला शिंपी म्हणून नोकरी मिळाली. ही नोकरी त्याने वयाच्या 73 व्या वर्षापर्यंत केली.
‘द अनड्रेस्ड नन’ आणि ‘क्रॉसरोड्स इन द शॅडोज’ ही दोन फ्रँकच्या आयुष्यावर आधरित पुस्तकं आहेत. या दोन पुस्तकांपासून प्रेरणा घेऊन फ्रँकची अविश्वसनीय कथा विविध टीव्ही कार्यक्रमांमध्ये प्रदर्शित केली गेली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List