वाढवण पोर्ट प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कशाप्रकारे करणार, शिवसेनेचा राज्यसभेत सवाल
वाढवणमध्ये मोठं पोर्ट येतंय. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यातला प्रमुख प्रश्न म्हणजे तिथल्या स्थानिक मच्छीमारांचं मोठय़ा प्रमाणामध्ये होणारं विस्थापन. या विस्थापित मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने कोणती ठोस योजना आखली आहे काय, असा सवाल करत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज मच्छीमारांच्या प्रश्नाला राज्यसभेत वाचा पह्डली.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात वाढवण बंदराच्या संदर्भात मच्छीमार बांधवांचा प्रश्न उपस्थित केला. या पोर्टमुळे मच्छीमारांच्या रोजगारावर संक्रांत येणार आहे. रत्नागिरीमधील रिफायनरीमुळे विषारी पाणी समुद्रात मिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा अनेक समस्यांना पोर्ट आल्यानंतर नागरिकांना सामोरे जावे लागेल, मात्र अनेक कुटुंबं या प्रकल्पामुळे विस्थापित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा सरकारने काय विचार केला आहे, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पेंद्रीय मत्स्योद्योग विभागाचे मंत्री राय लल्लनसिंग राजीव रंजन ऊर्फ लल्लनसिंग यांनी सरकार मच्छीमार बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मोघम आश्वासन दिले. शंभर गावे आम्ही निर्धारित केली आहेत, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List