चंद्रपूर शहरात खड्ड्यांनी प्रदूषण वाढविले, मार्च महिना ठरला सर्वाधिक प्रदूषित
रस्त्यांवरील खड्ड्यांनी अनेकांचे जीव घेतले, असं तुम्ही ऐकले असाल. मात्र चंद्रपूरातील खड्ड्यांनी चक्क प्रदूषणात भर घातली आहे. असं आम्ही म्हणत नाही, अभ्यासकांचे मत आहे. आता हे खड्डे खोदले कुणी, खोदले तर खोदले. बुजविले का नाही? हा खरा प्रश्न. या खड्ड्यांमुळे शहराचे नऊ दिवस अत्याधिक प्रदुषित तर अठरा दिवस साधारण प्रदुषीत ठरले आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी नूसार मार्च महिन्याचा 31 दिवसा पैकी पैकी 9 दिवस अत्याधिक प्रदूषण तर 18 दिवस साधारण प्रदूषण आणि केवळ चार दिवस समाधानकारक प्रदूषण आढळले आहे . आधीच प्रदुषित असलेल्या चंद्रपुर मध्ये मार्च महिन्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली.जानेवारी महिन्यात सर्व दिवस प्रदूशीत होते. फेब्रुवारी महिन्यात सुद्धा सर्व दिवस प्रदूषित होते . त्याही पेक्षा जास्त प्रदूषण मार्च महिन्यात आढळले. मार्च महिन्यात नऊ दिवस अत्यंत खराब प्रदूषण आढळले. त्या पाठोपाठ अठरा दिवस प्रदूषित होते. मार्च महिन्यातील 26 दिवस धूलिकण दहा मायक्रो मीटर तर पाच दिवस 2.5 मायक्रो मीटर आकाराच्या धूलिकणांचे प्रदूषण होते. हे सर्व प्रदूषणाचे नियम पाळले गेले नसल्याने घडलं.
एका योजनेसाठी चंद्रपूर शहरातील रस्त्यावर खड्डे खोदले गेले आहेत. ते खड्डे अद्याप बुजविले गेलेले नाहीत. खड्ड्यातील माती मार्गांवर आली आहे. वाहनामुळे, जोराच्या हवेमुळे धूळ सर्वत्र पसरत आहे. आधीच प्रदूषित असलेल्या वातावरणात हे धूळकण अधिकची भर घालीत आहेत, असे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. विशेष म्हणजे सुक्ष्म धूलिकणाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास तर झालाच त्यांचे आरोग्य घोक्यात आले आहे. वाढलेल्या प्रदूषणाला प्रशासन जबाबदार असून त्यामुळे नागरिकांना मोफत औषध उपचार दिले गेले पाहिजे, अशी मागणी प्रा. चोपणे यांनी केली.
शहरातील प्रदूषण निर्देशांक
0-50 AQI (Good) निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो असा एकही दिवस नव्हता. 51-100AQI ( Satisfactory) निर्देशांक हा समाधानकारक प्रदूषण मानले जाते. असे येथे 4 दिवस आढळले. 101-200 AQI ( Moderate) निर्देशांक प्रदूषित श्रेणीत येतो, असे येथे 18 दिवस आढळले. 201-300 AQI (Poor) निर्देशांक असून जास्त प्रदुषित मानला जातो, असे 9 दिवस आढळले.
प्रदूषणाची कारणे
वाहनांची वाढती संख्या ,त्यातून निघणारा धूर , धूळ , रस्त्यावरील धूळ, बांधकाम, स्थानिक थर्मल पॉवर उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे सर्वत्र प्रदूषणात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. चंद्रपुर शहरात अलीकडे शासकीय विकासकामे, विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्यामोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते.
चंद्रपुर शहर हे राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम अंतर्गत प्रदूषित शहराच्या यादीत मोडत असून येथे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण करण्याची मनाई आहे. असे असताना बांधकाम कंपनीला पर्यावरण संबंधित विविध अटी घालायला पाहिजे. चंद्रपुरमध्ये तीन महिन्यापासून चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदकाम केल्यामुळे प्रदूषणात भर पडली आहे. शहरात कुठलेही बांधकाम रात्री करावे, लोकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून दिवसा पाणी शिंपडावे, असे चोपणे म्हणालेत.
प्रदूषण नियंत्रण कसे होणार
प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे,चांगले आणि स्वच्छ रस्ते ठेवणे, शहरात सायकल चा उपयोग वाढविणे, बेटरी वर चालणारी वाहने वाढविणे, सार्वजनिक वाहने वापरने ,वाहनांच्या संख्येत घट करणे,कचरा न जाळणे , उदयोगांणी प्रदूषण रोखणे , नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अश्या उपाययोजना करणे, स्मोग टॉवर्स, फॉग मशीन किंवा कृत्रिम पाऊस हे तात्पुरते उपाय आहेत. प्रशासनाणे कडक उपाय योजना राबवून प्रदूषण स्रोत कमी करावे तरच प्रदूषणावर नियंत्रण होऊ शकेल
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List