वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, काय म्हणाले की इम्तियाज जलील

वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, काय म्हणाले की इम्तियाज जलील

रमजान ईदच्या एक दिवस आधी बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.यावर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की या मस्जिद स्फोटात बीड पोलिसांनी जी कारवाई केली आहे, त्यावर मी सुरुवातीला समाधानी होतो. परंतू पोलिसांनी एफआयआरमध्ये जी कलमे लावली आहेत त्यावर आपण समाधानी नाही असे त्यांनी म्हटले आहे.

इम्तियाज जलील पुढे म्हणाले की पोलिसांनी युएपीएनुसार गुन्हा दाखल केला आहे, त्यावर मी मात्र समाधानी नाही, त्या संदर्भात आधीही बोललो आहे, ज्या पध्दतीने स्फोट करणाऱ्यांनी सिगरेट पीत आणि इंस्टा रील्स करत मजिदमध्ये स्फोट घडवला. त्यावरून असे दिसते की त्यांना पोलीस आणि सरकारची भीती राहिलेली नाही. उत्तरप्रदेशामध्ये जे गुंडाराज सुरू आहे,ते गुंडाराज महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये, महाराष्ट्राची वेगळी एक संस्कृती आहे आणि महाराष्ट्राला शांती हवी आहे आणि आशा प्रकारच्या लोकांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

औरंगजेबची कबर लोकांनी जाऊन बघावी

इतिहास कसाही असुद्या पण या देशावर औरंगजेबने राज्य केलेले आहे आणि औरंगजेबचा मोठा कार्यकाळ होता. आणि औरंगजेब जेव्हा मारणार होता तेव्हा त्याने साधी कबर असावी आणि त्या काळात तो राजा असतानाही आणि त्यांनी सांगितले होते की माझी कबर खुप मोठी, चांगली आणि सोन्याची करा असे म्हटले नाही,त्यामुळे त्यांच्या इच्छेप्रमाणे ती साधी कबर आहे.राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जो मुद्दा सांगितला आहे, ती कबर काढू नये, तिथेच ठेवावी आणि इतिहास काय होता ते लोकांना कळू द्यावा ते योग्य आहे.ज्यांना पाहायची आहे ते लोक पाहातील आणि जे लोक धर्माच्या नावाखाली कबर उखडून टाकण्याची भाषा बोलतात, हे सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन घाणेरडे राजकारण करीत असतात.

एक ते दोन टक्के लोक हे प्रत्येक समाजात आहेत

शिवाजी महाराज यांनी अफजलखान याला ठार केले होते.त्याची कबर शिवाजी महाराजांनी बांधली आहे. आणि जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संभाषण सांगते की, एकदा माणूस मेला की वैर संपते. तीनशे वर्षापूर्वी काय झाले होते ते इम्तियाज जलील यांनी सांगितले पाहिजे का..? तुमच्याकडे कुठले मुद्दे राहिलेले नाही म्हणून हे मुद्दे घेऊन तुम्हाला राजकारण करायचे आहे का? पण लोक आता खूप हुशार झाले आहे, एक ते दोन टक्के लोक हे प्रत्येक समाजात आहेत, ते हिंदू, मुसलमान आणि बौध्द समाजातही आहेत असेही इम्तियाज म्हणाले.

समितीचे निर्णय मान्यच नव्हते..? तर हे नाटक का केले?

वक्फ बोर्डा संदर्भात जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार करण्यात आली होती आणि त्यामध्ये आमच्या पार्टीचे असदुद्दीन ओवैसी यांनी त्या ठिकाणी मोठी कामगिरी बजावली होती.जॉईंट पार्लमेंटरी समितीने आपला रिपोर्ट पार्लमेंटला सादर केलेला आहे. परंतु त्यापूर्वीच या सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. जे समितीने निर्णय घेतले आहे ते रद्द करण्यात आले आहेत. जर तुम्हाला समितीचे निर्णय मान्यच नव्हते..? तर हे नाटक का केले? लोकांचे पैसे आणि वेळ का वाया घातला. तुम्हाला तुमच्या पद्धतीने निर्णय घ्यायचा होता तर कशाला ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी( JPC) का तयार केली..?

वर्क्फ बोर्डावर इतर समाजाचे लोक येणार तर…

सरकारकडे आकडे आहेत आणि म्हणूनच आणि वक्फ बोर्डाच्या या बिलाला चंद्रबाबू नायडू, नितेश कुमार आणि अजित पवार यांनी या बिलाला उघड सपोर्ट केलेला आहे. आम्ही त्या बिलाला विरोध केलेला आहे आणि वक्त बोर्डाची जी संपत्ती आहे.ती मुस्लिम समाजाची संपत्ती आहे.मुस्लिम समाजाने दान केलेली ही सर्व मालमत्ता आहे. ही काही तुमची जहागीर नाही. म्हणजे माझ्या भाषेत बोललो तरी पप्पाची जागीर नाही. बोर्डावर तुमचे लोक येत असतील तर इतर जाती धर्माचे जे बोर्ड आहेत त्यांच्यातही आमचे लोक टाका अशी मागणी जलील यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चाळीशीत अप्सरा दिसाल, नवरा पुन्हा प्रेमात पडेल, फक्त आठवड्यातून 3 दिवस नारळ पाणी प्या चाळीशीत अप्सरा दिसाल, नवरा पुन्हा प्रेमात पडेल, फक्त आठवड्यातून 3 दिवस नारळ पाणी प्या
उन्हात नारळ पाणी पिण्याची मजा काही औरच असते, पण तुम्हाला माहित आहे का की, हे फक्त तहान भागवण्यासाठी आणि ताजेपणा...
MERC चा ग्राहकांना शॉक, वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती
IPL 2025 – जॉस बटलरची झुंजार अर्धशतकीय खेळी, गुजरातने RCB चा केला 8 विकेटने पराभव
मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते, त्यांच्या सैन्यात मुस्लीमही होते, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Mumbai Local – कुर्ला स्टेशनवर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून धूर, प्रवाशांची धावाधाव
लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी दिल्लीला रवाना