गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्राचा देशात 8 वा क्रमांक; फडणवीसांनी विधानसभेत मांडली आकडेवारी

गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्राचा देशात 8 वा क्रमांक; फडणवीसांनी विधानसभेत मांडली आकडेवारी

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली. इतर राज्यातील आकडेवारीची तुलना केल्यास गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात आठवा तर शहरांमध्ये नागपूरचा सातवा क्रमांक लागतो असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश, ओडिशा, आंध्रप्रदेश देशातील ही प्रमुख राज्य आपल्या पुढे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?   

ही गोष्ट खरी आहे की देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाचं राज्य आहे.  देशामध्ये जर आपण तुलना केली तर आपला क्रमांक गुन्हेगारीमध्ये आठवा आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश, ओडिशा, आंध्रप्रदेश ही जी काही महत्त्वाची राज्य आहेत ती क्राइम रेटमध्ये आपल्या पुढे आहेत. आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमाकांवर आपल्याला नागपूर दिसतं. पण ते यासाठी दिसतं की नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा जवळपास 25 टक्के भाग हा सामील केला, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एनसीआरबीच्या डेटामध्ये ते सध्याची लोकसंख्या पकडत नाही. त्यांचं म्हणणं असतं की, आम्ही फक्त जनगनणेचीच लोकसंख्या पकडून, त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मात्र लोकसंख्या 2011 चीच आहे. जर आपण आताची लोकसंख्या पकडली तर नागपूर हे 22 व्या 23 व्या क्रमांकावर जातं. त्यामुळे विचार केला तर पहिल्या दहामध्ये आपलं कोणतंही शहर नाही, मुंबई सारखं शहर हे पंधराव्या क्रमांकावर आहे, पुणे 18 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्या क्रमांकावर जयपूर आहे. तिसऱ्या क्रमाकांवर इंदोर आहे. चौथ्या क्रमांकावर कोची आहे. पाचव्या क्रमकांवर पटणा आहे. गाझियाबाद, कोझीकोड आहे.

त्यामुळे तुलनेनं महाराष्ट्रात जी शहरं आहेत, शहरीकरण आणि विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील इथे कायदा आणि सुवव्यस्था आपल्याला पाहायला मिळते. हे होत असताना आपण जर पाहिलं तर एकूण गुन्ह्याची संख्या आपण पाहिली तर आकडेवारी ही महत्त्वाची नसतेच, आकडेवारी ही मिसलिडींग असते. वस्तुस्थिती काय आहे हे महत्त्वाचं असतं तरी देखील काही गोष्टी या आकडेवारीतूनच सांगाव्या लागतात. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Konkan Railway: कोकण रेल्वे महामंडळ गुंडाळले, आता पुढे असा घेतला निर्णय Konkan Railway: कोकण रेल्वे महामंडळ गुंडाळले, आता पुढे असा घेतला निर्णय
Konkan Railway: महाराष्ट्रासाठी कोकण रेल्वे महामंडळ महत्वाची संस्था होती. या महामंडळाने जगातील सर्वात खडतर मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वे...
‘…त्या लोकांना माफी नाही, कबरीमध्ये लपले असले तरी शोधून काढणार’, फडणवीसांचा कडक इशारा
ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगद्याचा मार्ग मोकळा, MMRDA आणि MEIL विरोधातील याचिका फेटाळली
’60 वर्षांचा हिरो, हिरोईन 28ची…’ सिकंदरमधील सलमान-रश्मिकाची जोडी रुचली नाही, चाहत्यांकडून ट्रोल
पेरू विकणाऱ्या महिलेची प्रियांका चोप्रा फॅन झाली; उडत्या विमानात बनवला व्हिडीओ
टोस्टेड की साधा ब्रेड? कोणता आहे आरोग्यासाठी उत्तम?
मोक्ष मिळवण्याच्या बहाण्याने टेकडीवर नेत फ्रेंच पर्यटक महिलेवर अत्याचार, टुरिस्ट गाईडला अटक