‘या’ मुल्यांकाच्या व्यक्तींचा होऊ शकतो रहस्यमय मृत्यू…, श्रीदेवीच्या निधनाचं कारण असू शकतो ‘हा’ अंक?

‘या’ मुल्यांकाच्या व्यक्तींचा होऊ शकतो रहस्यमय मृत्यू…, श्रीदेवीच्या निधनाचं कारण असू शकतो ‘हा’ अंक?

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांनी असंख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. श्रीदेवी यांचं निधन रहस्यमय होतं. दुबईत एका लग्न कार्यासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात आला आणि बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. आजही श्रीदेवी यांना कोणी विसरु शकलेलं नाही. दुबईत श्रीदेवी जुमॅरा एमिरेट्स टाव्हर हॉटेलच्या 2201 या रुममध्ये थांबल्या होत्या.

हॉटेलच्या रुममधील बाथटबमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला आणि त्या पुन्हा भारतात कधी आल्याच नाही. सांगायचं झालं तर, श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्त रोजी झाला. म्हणजे त्यांचा मुल्यांक आहे 4. चला जाणून घेऊया 4 नंबरचे लोक कसे असतात. त्यांच्या रहस्यमय मृत्यूमागे हा मुद्दा असू शकतो का?

4 मुल्यांक अशा लोकांचा असतो, ज्यांच्या जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, किंवा 31 या तारखेला झालेला असेल. या अंकाचा स्वामी ग्रह राहू असतो. जे अचानक बदल आणि अनपेक्षित घटनांशी संबंधित असल्याचं मानलं जातं. 4 मुल्यांक असलेले लोकं प्रचंड मेहनती असतात. आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी ते दिवस – रात्र मेहनत घेतात.

4 मुल्यांक असलेले लोक कामालाच त्यांची पूजा मानतात. राहूच्या प्रभावामुळे त्यांचे व्यक्तिमत्व थोडे गूढ आणि आकर्षक बनते. ते त्यांचे मत फार मोकळेपणाने मांडत नाहीत, त्यामुळे लोक त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतात.

या अंकाचे लोक स्वतःला पारंपरिक विचारसरणीपासून दूर ठेवतात आणि स्वतःचा मार्ग तयार करतात. त्यांचा हट्टी स्वभाव त्यांच्यासाठी कधीकधी अडचणीचा ठरतो. त्यांना त्यांचे विचार बदलण्यास वेळ लागतो आणि इतरांच्या सल्ल्याचं पालन करणं त्यांना कठीण जातं.

त्यांच्या आयुष्यात अचानक उतार – चढाव येत असतात. आयुष्यात झालेले बदल हे लोकं सहज स्वीकारत नाहीत. अनेकदा यांच्या हातातून नव्या संधी देखील जातात. हे लोक भावनांपेक्षा तर्कशास्त्र जास्त पाळतात. नातेसंबंधांमध्ये ते थोडे कठोर वाटू शकतात, पण ते खूप निष्ठावान असतात.

श्रीदेवी आणि 4 या अंकाचं कनेक्शन

श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 मध्ये झाला होता. म्हणजे त्यांचा मुल्यांक 4 आहे. त्यांचा मृत्यू 24 फेबुवारी 2018 मध्ये झाला. त्यांच्या मृत्यू रहस्यमय होता. म्हणून त्यांच्या मृत्यू आणि 4 या अंकाचं कनेक्शन असल्याचं सांगितलं जातं.

( Disclaimer : येथे दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीला टीव्ही 9 मराठी वेबसाईट दुजोरा देत नाही. अंधश्रद्धेला आम्ही खतपाणी घालत नाही. )

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल
माजी आरोग्य मंत्री आणि कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांना कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं पी. एच. डी. प्रदान...
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते, त्यांच्या सैन्यात मुस्लीमही होते, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Mumbai Local – कुर्ला स्टेशनवर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून धूर, प्रवाशांची धावाधाव
लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी दिल्लीला रवाना
मध्य प्रदेशमध्ये दोन महिला माओवाद्यांचा खात्मा, दोघींच्या डोक्यावर होते प्रत्येकी 14 लाखांचे बक्षिस
IPL 2025 – राजस्थान विजयी ट्रॅकवर परतणार? दमदार यष्टीरक्षकाचं होणार पुनरागमन
BSNL ने 1,757 कोटी रुपयांवर पाणी सोडलं? कॅगच्या अहवालातून मोठा घोळ उघड