‘ना डान्स येत, ना डायलॉग बोलता येत…’, अभिनेत्रीची ऑडिशन पाहून करण जोहर भडकला, केला सर्वांसमोर अपमान
आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘मोहब्बतें’ हा रोमँटिक चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात उदय चोप्रा, शमिता शेट्टी, जुगल हंसराज, किम शर्मा, जिमी शेरगिल आणि प्रीती झांगियानी हे कलाकारही होते. पण याच चित्रपटातील एका अभिनेत्रीने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिचा या चित्रपटाच्या ऑडिशनचा अनुभव आणि किस्सा सांगितला.
अभिनेत्रीचे ऑडिशन पाहून करण जोहर भडकला
‘मोहब्बतें’ चित्रपटाचे या अभिनेत्रीने ऑडिशन दिले होते मात्र ते ऑडिशन पाहून करण जोहरचा पारा चढला होता. त्याला तिचे ऑडिशन अजिबात आवडले नव्हते त्यामुळे त्याने तिच्यावर संताप व्यक्त करत तिचा अपमानही केला होता. हा किस्सा ज्या अभिनेत्रीसोबत घडला ती अभिनेत्री म्हणजे किम शर्मा.
किम शर्माने ‘मोहब्बतें’साठी ऑडिशन दिलं होतं. तिने हा किस्सा सांगताना म्हटलं की, ‘मी तीन वेळा ऑडिशन दिलं होतं, एकदा सहाय्यक दिग्दर्शक निखिल अडवाणीसमोर आणि दुसऱ्यांदा करण जोहरसमोर.मात्र त्याला ते आवडलं नव्हतं, तेव्हा तो चिडून बोलला होता की, तुला डान्स येत नाही, तुला डायलॉग बोलता येत नाही तरीही तुला अभिनेत्री का व्हायचं आहे? त्यावेळी मग मी म्हणालो की, मला अभिनेत्री व्हायचं नाही आणि मी इथे आले आहे कारण मला इथे येण्यास सांगितलं होतं. काहीही झालं नाही तरी काही फरक पडत नाही. पण माझे तिसरे ऑडिशन आदित्य चोप्राने घेतलं आणि त्याला मी खूप आवडले आणि तो चित्रपट मला मिळाला’ किमने तिचा हा अनुभव शेअर केला आहे.
किमला शाहरुख-अमिताभकडून काहीही शिकता आले नाही
किमने असेही सांगितले की तिच्या पहिल्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसोबत काम करूनही तिला काहीही शिकता आले नाही. ती म्हणाली की, “मी लक्ष देत नसल्यानं मी काहीही शिकले नाही. तुम्हाला परिस्थिती समजून घ्यावी लागेल. मी लहान होते, मी त्यांना ओळखत नव्हते त्यामुळे मला काही फरक पडतच नव्हता. म्हणून मी याला वेळेचा अपव्यय म्हणणार नाही. मला माझ्या आयुष्यात कोणताही पश्चात्ताप नाही. जर मी आज शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं असतं तर मला खूप काही शिकायला मिळालं असतं. पण मी 18 वर्षांची असल्याने ते माझ्यासाठी खूप चांगले लोक होते. आणि शाहरुख खानसोबतही मी खूप छान वेळ घालवला” असं म्हणत तिने एकंदरितच तिचा अनुभव शेअर केला.
‘मोहब्बतें’ नंतर किम शर्मा ‘तुम से अच्छा कौन है’, ‘यकीन’, ‘फिदा’ आणि ‘टॉम डिक तसेच हॅरी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. पण तिच्या कारकिर्दीत विशेष काही ती करू शकली नाही.
किम शर्माचा घटस्फोट अन् अफेअर्स
2010 मध्ये लग्न झाल्यानंतर तिने अभिनयापासून स्वतःला दूर केलं. किम शर्माचा शेवटचा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झालेला ‘लुटेरा’ होता. तिने केनियास्थित व्यावसायिक अली पंजानीशी लग्न केले ज्यांच्यासोबत ती केनियाला गेली. मात्र 2016 मध्ये घटस्फोटानंतर किम शर्मा मुंबईत परतली.
किम शर्माने अनेक सेलिब्रिटींना डेट केले आहे. किम शर्मा तिच्या अफेअर्समुळेही चर्चेत राहिली आहे. तिने 2003 मध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला डेट करायला सुरुवात केली आणि त्यांचे नाते 4 वर्षांहून अधिक काळ टिकले होते. दोघेही अनेकदा पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले.
घटस्फोटानंतर, किम शर्मा 2018 ते 2019 दरम्यान काही काळ हर्षवर्धन राणेसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर तिने 2019 ते 2021 पर्यंत माजी टेनिसपटू लिएंडर पेसला डेट केलं. मात्र यातील एकही नात तिचे टिकले नाही.
किम शर्मा आता काय करते?
कामाच्या बाबतीत बोलायचे झालं तर, किम शर्मा आता करण जोहरसोबत धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतेय, जी एक टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी आहे. ही एजन्सी जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स आणि बंटी सजदेहच्या कॉर्नरस्टोन यांच्या सहकार्याने चालते. बंटी सजदेह हा सलमान खानचा भाऊ सोहेल खानची माजी पत्नी सीमा किरण सजदेहचा भाऊ आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List