लग्नाचा 25वा वाढदिवस, पत्नीसोबत डान्स, नाचता नाचता कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं

लग्नाचा 25वा वाढदिवस, पत्नीसोबत डान्स, नाचता नाचता कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं

लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पती-पत्नी स्टेजवर एकमेकांसोबत डान्स करत होते. नाचता नाचता अचानक पती खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. नाचताना हृदयविकाराचा झटका आल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वसीम सरवत असे 50 वर्षीय मयत व्यक्तीचे नाव असून ते बिझनेसमन आहेत. वसीम आणि त्यांची पत्नी फराह यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी पिलीभीत बायपास रोडवर एका हॉलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीसाठी सर्व नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होता.

पार्टीत वसीम आणि त्यांची पत्नी फराह दोघे स्टेजवर एकमेकांसोबत डान्स करत होते. नाचत असतानाच वसीम अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना बेशुद्धावस्थेत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वसीमच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुतीमधील मंत्र्यांमध्ये नाराजीनाट्य, अधिकार मिळत नसल्याने राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाणार महायुतीमधील मंत्र्यांमध्ये नाराजीनाट्य, अधिकार मिळत नसल्याने राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाणार
CM Devendra Fadnavis Cabinet: राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यानंतर मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा प्रकार...
MNS : ‘कसला माज’, मेट्रोला फक्त 2 दिवस दिले, बँकानंतर मनसेच आता नवीन टार्गेट
‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’; गॅस दरवाढीवर शरद पवार गटाचा सणसणीत टोला, खुल्या पत्रातून मोदी सरकारवर निशाणा
त्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडायचं – संजय राऊतांचा सरकारवर निशाणा
आमदार निवासातून रुग्णवाहिकेला वारंवार फोन, पण अ‍ॅम्बुलन्स न आल्याने व्यक्तीचा मृत्यू
अमिताभ बच्चन यांनी रेखाला सेटवर सर्वांसमोर जोरदार थप्पड का लगावली होती?
सैफ अली खानला कानशिला मारली की नाही? मलायका अरोराविरुद्ध वॉरंट जारी, काय आहे प्रकरण?