Mumbai News – भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक, एक महिला ठार; तीन जण जखमी

Mumbai News – भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक, एक महिला ठार; तीन जण जखमी

भरधाव स्कॉर्पिओ कारने रिक्षाला धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात रिक्षाचालकासह दोन महिला जखमी झाल्या आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर गोरेगाव येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. दारुच्या नशेत सीआयएसएफचा जवान ही गाडी चालवत होता. वनराई पोलिसांनी जवानाला अटक केली आहे.

धुंधराम यादव हा जवान मद्यधुंद अवस्थेत राँग साईडने गाडी चालवत होता. दारुच्या नशेत धुंधरामने विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षातील हाजरा इस्माईल शेख या महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या दोन मुलींसह रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षा आणि कार ताब्यात घेतली. याप्रकरणी आरोपी जवानाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीला बोरीवली कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon Update : देशात यंदा धो-धो पाऊस कोसळणार; महाराष्ट्रात काय स्थिती, पहिला अंदाज समोर Monsoon Update : देशात यंदा धो-धो पाऊस कोसळणार; महाराष्ट्रात काय स्थिती, पहिला अंदाज समोर
यावर्षी राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे, या संदर्भात स्कायमेटचा एक रिपोर्ट आता समोर आला...
सावध रहा, मुंबईत सर्वात मोठी लाट या तारखेला येणार, हे १८ दिवस उधाण वाऱ्याचे
मुलगी राहिली बाजूला गडी सासूला घेऊन फरार, 9 दिवसांनी मुलीसोबत होणार होतं लग्न
नगरविकास मंत्र्यांनी त्यांचे खिसे भरले पण रस्त्यात माल भरला नाही, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
Jalna News – पत्नीचं ऑनलाईन प्रेम जुळलं अन् बिंग फुटलं; बांगलादेशी दाम्पत्य जेरबंद
महाराष्ट्रातल्या लोकांना विचारा भाजपने महाराष्ट्र निवडणूक कशी जिंकली, ते सांगतील; राहुल गांधींचा हल्लाबोल
या चित्रपटानं बॉलिवूडमध्ये उडवली होती खळबळ, तिकिटासाठी 5 किलोमीटरपर्यंत रांगा, लोक दोन-दोन दिवस रस्त्यावर झोपायचे