राजस्थानात ईदच्या नमाजानंतर पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद; महामार्गावरील वाहतूक ठप्प

राजस्थानात ईदच्या नमाजानंतर पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद; महामार्गावरील वाहतूक ठप्प

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात सोमवारी ईदच्या नमाजानंतर पोलीस आणि मुस्लिम समुदायाच्या स्थानिकांमध्ये वाद झाला. समुदायातीस स्थानिकांनी स्टँड चौकात मिरवणूक काढण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली. मिरवणुकीवेळी घोषणाबाजी करता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट शब्दात बजावले. पोलिसांच्या या भूमिकेवर स्थानिकांनी आक्षेप घेतला आणि वादाला तोंड फुटले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. तसेच गर्दी जमल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

ईदच्या नमाजानंतर मुस्लिम समुदायातील स्थानिकांनी पोलिसांकडे मिरवणूक काढण्याची परवानगी मागितली. मिरवणुकीवेळी घोषणाबाजी करता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट शब्दात बजावले. पोलिसांच्या या भूमिकेवर स्थानिकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि स्थानिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्याचे रुपांतर वादात झाले. जमावाकडून घोषणाबाजीही करण्यात आली, त्यामुळे गर्दी वाढतच गेली. वाढत्या गर्दीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. अखेर पोलिसांनी जमावाला पांगवले आणि सुव्यवस्था पूर्ववत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जग्वार लढाऊ विमान कोसळले; पायलट गंभीर जग्वार लढाऊ विमान कोसळले; पायलट गंभीर
लढाऊ विमान कोसळल्याची घटना गुजरातच्या जामनगर येथे घडली. जग्वार लढाऊ विमान सुवरडा गावातील बाहेरच्या परिसरात कोसळले. विमानाचा पायलट अत्यंत गंभीर...
गांधीजींच्या पणती नीलमबेन यांचे निधन
बार कौन्सिल ऑफ इंडियाला लॉ स्कूलची तपासणी करण्याचा अधिकार, हायकोर्टाने याचिका फेटाळली
विमानतळावरून 17 कोटीचे कोकेन जप्त
चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी परत मिळवून दिला! 86 लाख 62हजार रुपयांचा मुद्देमाल परत केला
यूपीआय सेवा ठप्प, ग्राहकांचा संताप
मुंबईकरांचा पाणीसाठा आला 35 टक्क्यांवर, कडक उन्हामुळे तलावांमधील पाणी आटले