रेसिप्रोकल टेरिफच्या टेन्शनमुळे शेअर बाजारात भूकंप

रेसिप्रोकल टेरिफच्या टेन्शनमुळे शेअर बाजारात भूकंप

हिंदुस्थानातील उत्पादनांवर 2 एप्रिलपासून रेसिप्रोकल टेरिफ म्हणजेच जशास तसे अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या टेरीफच्या टेन्शनमुळे आज शेअर बाजारात अक्षरशः भूपंप झाला. शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 1 हजार 390 अंकांनी म्हणजेच 1.80 टक्क्यांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 3.49 लाख कोटी बुडाले. अमेरिकेचे टेरिफ लागू होण्यापूर्वीच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर शेअर्सच्या विक्रीला सुरुवात केली. त्यामुळे सेन्सेक्स 1 हजार 390 अंकांनी घसरून 76,024 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 353 अंकांनी घसरून 23,965 अंकांवर बंद झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवप्रेमींनी गनिमी काव्याने शिवरायांचा पुतळा बसवला, परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याचा प्रयत्न; गावात तणाव, पोलिसांकडून लाठीमार शिवप्रेमींनी गनिमी काव्याने शिवरायांचा पुतळा बसवला, परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याचा प्रयत्न; गावात तणाव, पोलिसांकडून लाठीमार
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 30 मार्च रोजी शिवप्रेमींनी मध्यरात्री गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. मात्र, परवानगी...
फोडा आणि राज्य करा हेच सरकारचे धोरण, गौरव गोगोईंचा मोदी सरकारवर घणाघात
मुस्लिमांचे मालमत्तेचे अधिकार हिरावून घेण्याचे शस्त्र – राहुल गांधी
IPL 2025 – चिन्नास्वामीवर बटलर-सिराजचे राज, गुजरातचा बंगळुरूला दणदणीत धक्का
‘वक्फ’ विधेयक लोकसभेत मंजूर, देशभरातील 9.4 लाख एकर जमिनीवर नियंत्रण कुणाचे?
Waqf Amendment Bill – वक्फ बोर्डाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव, शिवसेनेला सौहार्द हवे आहे, द्वेष नको
लालूप्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रुग्णालयात