नववर्षात गुढी उभारण्याच्या कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबईतील वांद्रे येथील गांधीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी जनतेला गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देत आता गुढी कोठे उभारायची ते आपल्याला माहिती आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन केले.
गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्याला हक्काचा आणि जनतेने निवडून दिलेला आमदार मिळाला आहे. त्याचा आपल्याला अभिमान आहे. वांद्रे पूर्व हा आपलाच इलाखा आहे. आपला इलाखा म्हटला की कामही दणक्यात व्हायला पाहिजे. इथे आपला आमदार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल, यात शंका नाही. ही सर्व आपल्या हक्काची जनता आहे. त्यांचे आशिर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कार्यालयाच्या सुरुवातीला ते आशिर्वाद देत आहे. त्यांचे आशिर्वाद हे आपले बळ आहे. नवीन वर्ष सुरू झाले आहे, गुढी कुठे उभारायची हे आपल्याला माहिती आहे. आता त्या दिशेने कामाला लागा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List