Tonga Islands Earthquake – म्यानमारनंतर टोंगा बेटांवर भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा
म्यानमारनंतर आता नैऋत्य प्रशांत महासागर क्षेत्रातील टोंगा बेटांना भूकंपाचा धक्का बसला आहे. रविवारी सायंकाळी 5.48 वाजता टोंगा बेटांवर 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली. भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही असे अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) ने दिला आहे.
टोंगाच्या मुख्य बेटापासून सुमारे 100 किमी ईशान्येस हा भूकंप झाल्याचे यूएसजीएसने म्हटले आहे. भूकंपाच्या केंद्रापासून 300 किमी अंतरावरील किनारी भागात धोकादायक लाटा येऊ शकतात, असा इशारा पॅसिफिक त्सुनामी केंद्राने जारी केला.
टोंगा हे एक पॉलिनेशियन राष्ट्र असून यात 171 बेटे आहेत. याची लोकसंख्या 1 लाखापेक्षा अधिक आहे. यातील बहुतेक लोक टोंगाटापूच्या मुख्य बेटावर राहतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List