बीड मशीद स्फोटाप्रकरणी दोन आरोपींना अटक, जिलेटिन स्टिकने स्फोट झाल्याची पोलिसांची माहिती
बीड जिल्ह्यात एका मशिदीत स्फोट झाला होता. ईदपूर्वी हा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली होती. आता पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी जिलेटिन स्टिकच्या सहाय्याने हा स्फोट केला होता. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती मशिदीच्या मागच्या रस्त्याने मशिदीत घुसला. त्यानंतर या व्यक्तीने मशिदीत या जिलेटिन स्टिक लावल्या आणि पळून गेला. काही वेळानंतर मशिदीत स्फोट झाला. घटेनेची माहित मिळताच ग्रामस्थांनी पोलिसांना पहाटे चार वाजता माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावात कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस तैनात केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List