MI vs KKR – मुंबईने उघडलं विजयाचं खातं, कोलकात्याचा 8 विकेट्सने केला पराभव

MI vs KKR – मुंबईने उघडलं विजयाचं खातं, कोलकात्याचा 8 विकेट्सने केला पराभव

मुंबई इंडियन्सने अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. सलग दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम गोलंदाजी करत कोलकाताला 16.2 षटकांत 116 धावांत सर्वबाद केले. त्यानंतर फलंदाजी करताना मुंबईने हे लक्ष्य अवघ्या 12.5 षटकांत 2 गडी गमावून गाठलं.

मुंबईच्या विजयात पदार्पणवीर अश्विनी कुमारने मोलाची भूमिका बजावली. त्याने 4 षटके गोलंदाजी करत 24 धावा देत 4 बळी घेतले. त्याच्या या खेळीने कोलकाताला मोठा धक्का बसला आहे. अश्विनीने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात इतिहास रचला.

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा सलामीवीर रायन रिकल्टनने नाबाद 62 धावा (41 चेंडू) कुटल्या, तर सूर्यकुमार यादवने नाबाद 27 धावा (9 चेंडू) केलाय. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी नाबाद 51 धावांची भागीदारी करत मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. रिकल्टनने आपली पहिली आयपीएल अर्धशतकी खेळी साकारली, तर सूर्यकुमारने आपल्या आक्रमक शैलीने सामना जिकंण्यात मदत केली.

कोलकाताचा डाव कोसळला

प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबावात ठेवले. अश्विनी कुमारच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी आक्रमणाने कोलकाताला 116 धावांतच गुंडाळले. कोलकात्याकडून अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक 26 धावा केल्या, पण इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ठरलं तर मग’ मालिकेत ‘झिम्मा’ फेम अभिनेत्रीची एण्ट्री; साकारणार नामांकित वकील ‘ठरलं तर मग’ मालिकेत ‘झिम्मा’ फेम अभिनेत्रीची एण्ट्री; साकारणार नामांकित वकील
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. साक्षी आणि महिपतची कारस्थानं...
‘घिबली फोटो बनवणं बंद करा..’; नेटकऱ्यांवर संतापला गायक, नेमकं काय आहे कारण?
ऐश्वर्या-अभिषेकचा ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स पाहून तुम्हीही घटस्फोटाच्या चर्चा विसराल
Whatsapp Status व्हॉट्सऍपवर आता म्युझिकचे स्टेट्स ठेवा
हिंदुस्थानी ज्ञान, विज्ञान आणि धर्माला जगात मान्यता, ‘गरू गीता’ ग्रंथाच्या प्रकाशनावेळी नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Kunal Kamra- काॅमेडीयन कुणाल कामराला पोलिसांचे तिसरे समन्स; 5 एप्रिलला पुन्हा चौकशीसाठी बोलावले
BJP President – भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? सूत्रांनी दिली माहिती