आधी सिलेंडर फुटला, मग फटाक्यांचा स्फोट; 7 जणांचा मृत्यू; काही जण जखमी
सिलेंडर फुटल्याने घरातील फटाक्यांचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते. स्फोटानंतर घराचेही नुकसान झाले. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील ढोलाहाट परिसरात ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मयतांची अद्याप ओळख पटलेली नाही. स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List