आईवरून अश्लील विनोद महिला कॉमेडियन वादाच्या भोवऱ्यात, लोकांनी काढली खरडपट्टी
Swati Sachdeva Standup Comedy: सोशल मीडियावर स्टँड अप कॉमेडी करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे कॉमेडियन यांची प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत देखील मोठी वाढ होत. पण अनेकदा कॉमेडियन कलाकारांना त्यांच्या विनोदांमुळे वादग्रस्त परिस्थितीचा देखील सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज गॉट लेटेंट’शोमध्ये युट्युबर रणवीर अलाहाबादिया पालकांच्या लैंगिक जीवनावर भाष्य केल्याने मोठा वाद सुरू होता. ज्यामुळे रणबीर कायद्याच्या कचाट्यात देखील अडकला. रणवीर अलाहाबादिया याचं प्रकरण ताजं असताना आणखी एका महिला कॉमेडियनने आईवर अश्लील विनोद केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियीवर लोकांनी तिची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
आईवर अश्लील विनोद करणारी महिली कॉमेडियन दुसरी तिसरी कोणी नाही तर, स्टँड-अप कॉमेडियन आहे स्वाती सचदेवा आहे. आईवर अश्लील विनोद केल्यामुळे स्वाती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या सोशल मीडियावर स्वातीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल आहे.
व्हिडीओमध्ये स्वाती म्हणते, ‘माझी आई कूल बनण्याचा प्रयत्न करतेय, पण तिच्याकडून ते घडत नाहीये.’ स्वातीच्या आईला व्हायब्रेटर सापडला आणि त्यावर दोघींमध्ये काय संभाषण झालं, हे तिने विनोद करत सांगितले आहे. ज्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रणबीर याच्यानंतर स्वाती हिची देखील चौकशी होणार का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींनी संताप व्यक्त केला तर काहींना मात्र काहीही हरकत नाही… अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्वातीच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. नेटकरी तिच्या व्हिडीओवर संताप व्यक्त करत आहेत.
स्वातीने केलेल्या विनोदावर टीका करत एक नेटकरी म्हणाला, ‘तिने AMITY मधून शिक्षण घेतलं आहे. चांगली नोकरी मिळाली नाही म्हणून तिने अडल्ट कंटेंट लिहायला सुरुवात केली…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘लज्जास्पद, विनोद आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला संपूर्ण समाजाला बदनाम करत आहे.’, ‘विनोद ठिक आहे, पण आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत…’ असं देखील नेटकरी म्हणत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List