स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका ठरली महामालिका; प्रेक्षकांकडून भरघोस मतदान

स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका ठरली महामालिका; प्रेक्षकांकडून भरघोस मतदान

‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा 2025’ नुकताच जल्लोषात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे पाचवं वर्ष होतं. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण अशा या सोहळ्यात ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाने सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचा पुरस्कार पटकावला. तर ‘ठरलं तर मग’ ही मालिका महाराष्ट्राची महामालिका ठरली. प्रेक्षकांनी केलेल्या भरघोस मतदानाच्या माध्यमातून ‘ठरलं तर मग’ या मालिकेला सलग दुसऱ्या वर्षी महामालिकेचा पुरस्कार बहाल करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार देण्याचा मान महामालिकेसाठी व्होट करणाऱ्या दोन भाग्यवान प्रेक्षकांना देण्यात आला.

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सुनेचा पुरस्कार ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील जानकीने पटकावला. तर ऋषिकेशने सर्वोत्कृष्ट पतीचा पुरस्कार आपल्या नावे केला. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील मुक्ता आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कला यांना सर्वोत्कृष्ट पत्नीचा पुरस्कार देण्यात आला. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील राया आणि मंजिरीने सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार जिंकला. तर ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतील अर्णव – ईश्वरीला सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडीचा पुरस्कार मिळाला. ‘मुरांबा’ मालिकेतील अक्षय-रमाची जोडी महाराष्ट्राची रोमँटिक जोडी ठरली.

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतील यशवंत आणि शुभा यांना सर्वोत्कृष्ट आई-बाबा पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर सर्वोत्कृष्ट सासू आणि सासरे ठरले ‘साधी माणसं’ मालिकेतील निरुपा आणि सुधाकर. यंदाचा सर्वोत्कृष्ट खलनायिका हा पुरस्कार ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील ऐश्वर्या आणि ‘ठरलं तर मग’मधल्या प्रिया यांना विभागून देण्यात आला. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील पार्थ, जीवा, युग आणि नंदिनी, काव्या, आरुषी यांनी सर्वोत्कृष्ट भावंड पुरस्कार पटकावला.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील चांदेकर परिवार हा यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट परिवार ठरला. प्रवाह परिवारात नव्याने सहभागी झालेल्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील नंदिनी आणि ‘थोडं तुझं आणि थोड माझं’ मालिकेतील तेजस यांना सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरस्कार देण्यात आला. आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचीच मनं जिंकणारी ‘साधी माणसं’ मालिकेतील मीरा सर्वोत्कृष्ट मुलगी ठरली तर समृद्धी केळकरने सर्वोत्कृष्ट निवेदकाचा पुरस्कार पटकावला. ‘फेव्हरेट ग्लॅमरस फेस’ पुरस्काराचे मानकरी ठरले ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील मानसी आणि ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील अर्णव.

परीक्षकांच्या पसंतीचा कौल घेऊन सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेला देण्यात आला. ‘उदे गं अंबे’ मालिकेलाही विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. स्टार प्रवाह परिवाराची धडाकेबाज सदस्य ठरली अबोली तर आकाश, भूमी आणि रागिणी यांना त्रिकुट नंबर वन पुरस्कार देण्यात आला. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नागपूर तणाव : पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन सुरु, महाल भागात दंगल नियंत्रण पथक दाखल नागपूर तणाव : पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन सुरु, महाल भागात दंगल नियंत्रण पथक दाखल
नागपूरात औरंगजेब याच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या...
बदलत्या हवामानात कोंड्याची समस्या वाढतेय? ‘या’ टिप्स करा फॉलो
नागपुरातील घटनेला सरकार जबाबदार, नागपूरकरांनी शांतता बाळगावी – अंबादास दानवे
महत्वाची बातमी, एसटी बंद पडल्यास कोणत्याही श्रेणीच्या बसमधून त्याच तिकीटावर प्रवास
रवींद्र नाट्य मंदिरात भरणार सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन!; अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार
नागपुरात दोन गटात राडा; तुफान दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न
Honey Bee Attack – अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला, 50 जण जखमी