आझाद मैदानात 12 तासच आंदोलन करता येणार, पोलिसांची नियमावली; दोन आठवड्यांत अधिसूचना जारी करणार

आझाद मैदानात 12 तासच आंदोलन करता येणार, पोलिसांची नियमावली; दोन आठवड्यांत अधिसूचना जारी करणार

आंदोलनकर्त्यांचे हक्काचे ठिकाण असलेल्या ऐतिहासिक आझाद मैदानात आता केवळ 12 तासच आंदोलन करता येणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना दोन आठवडय़ांत जारी करण्यात जाईल. मुंबई पोलिसांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर यासंदर्भात गेली 28 वर्षे प्रलंबित असलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.

सरकारी वकील अभय पत्की यांनी पोलिसांच्या वतीने मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाला ही माहिती दिली. या नियमावलीची अधिसचूना एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत काढा. तसेच नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. नियमावलीवर आक्षेप असल्यास याचिकाकर्ते नव्याने याचिका करू शकतात, असेही न्यायालयाने नमूद केले. या नियमावलीत आंदोलकर्त्यांकरिता आचारसंहिता नेमून देण्यात आली आहे.

आंदोलकर्त्यांकरिता आचारसंहिता

n काठय़ा सोबत आणायच्या नाहीत.

n मोठे लाऊडस्पिकर आणायचे नाहीत.

n मोठय़ाने घोषणा द्यायच्या नाहीत.

n नागरिकांना त्रास होईल, असे वर्तन करायचे नाही.

n आंदोलनासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घ्यायची.

28 वर्षांनी याचिका निकाली

सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून निघणारे मोर्चे व आंदोलने मंत्रालयावर धडकतात. त्यामुळे डी. एन. रोड व जे. एन. टाटा रोडवरील रहिवासी व दुकानदार यांना नाहक त्रास होतो. त्यामुळे या मार्गावर मोर्चे, आंदोलनांना परवानगी देऊ नये, फटाके फोडण्यास व लाऊडस्पिकर लावण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका चर्चगेट व मरीन ड्राईव्ह रहिवासी संघाने केली होती. त्याची दखल घेत आंदोलनांसाठी नियमावली तयार करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यानुसार आंदोलनांसाठी आझाद मैदानात जागा निश्चित करण्यात आली. मंत्रालयापर्यंत जाणारे मोर्चे व आंदोलने रोखण्यासाठी काही नियमही तयार करण्यात आले. मात्र निश्चित व स्पष्ट नियम तयार करून त्याची अधिसूचित करण्यास न्यायालयाने पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर अखेर 28 वर्षांनी ही याचिका निकाली काढण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत बदल, कोणते मार्ग राहणार बंद? राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत बदल, कोणते मार्ग राहणार बंद?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा आयोजित केली आहे. ही सभा...
प्रचंड ग्लॅमरस आहे राधे माँची सून, फिटनेस आणि अध्यात्म दोन्हीमध्ये सक्रिय
Sikandar Review: पुन्हा एक फ्लॉप सिनेमा… काय आहे सलमान खानच्या ‘सिंकदर’ची कथा? वाचा रिव्ह्यू
Sikandar Leaked: सलमान खानच्या ‘सिकंदर’ला मोठा फटका; एचडीमध्ये चित्रपट लीक
… तर अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे – संजय राऊत
मोदींचा स्वभाव पाहता ते फक्त सत्तेसाठीच एखाद्याशी जुळवून घेऊ शकतात, संजय राऊत यांची टीका
राज ठाकरेंना कळकळीचं आवाहन, तर अजितदादांकडे राजीनाम्याची मागणी; संजय राऊत यांची टोलेबाजी काय?