धनंजय मुंडेच्या माणसांनी 36 गुंठे जमीन हडपली – सारंगी महाजन
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माणसांनी माझी 36 गुंठे जमीन हडपली, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आज सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादासंदर्भात अंबेजोगाई न्यायालयात सुनावणी पार पडली. याप्रकरणी पुढील सुनावणी 4 एप्रिल रोजी होणार आहे. यातच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे.
काय म्हणाल्या सारंगी महाजन?
सारंगी महाजन म्हणाल्या की, “बीड बायपास नवीन मार्ग झाला असून त्यात माझी 26 गुंठे जमीन केली आणि 36 गुंठे जमीन माझी या लोकांनी (धनंजय मुंडे यांच्या सहकार्यांनी) चुकीची नोंदणी करून बळकावली आहे. यात धनंजय मुंडे यांचा माणूस गोविंद मुंडे हा सामील आहे. त्यानेच मध्यस्थी केली होती. त्याने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नाव सांगून हे दोघे माझी जमीन बळकावून घेतली. तो मला म्हणाला होता की, त्यांना जर कळलं तर हे लोक तुम्हाला जमीन मिळू देणार नाही. तुम्हाला नंतर याचा त्रास होईल, यापेक्षा मी तुम्हाला याची नोंदणी करून देतो, असं गोविंद मुंडे याने मला सांगितलं आणि फसवणूक केली.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List