सिग्नलवर गैरवर्तन करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन
On
आलिशान कारमधून उतरून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. देश सोडून जायचे नाही, दर सोमवारी 11 ते 2 या वेळेत पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावायची, या अटी-शर्तीवर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजाने चौकात कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर येरवडा पोलिसांनी गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना अटक केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
30 Mar 2025 12:04:51
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्यातील दोन नेत्यांना लक्ष केलं आहे. मनसेचा आज गुढीपाडव्या निमित्ताने मेळावा आहे. या...
Comment List