ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी अन् गद्दार शब्दांना बंदी आहे का? पुण्यातील शिवसेनेच्या व्यंगचित्राची चर्चा
‘ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार…’ या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का? असे व्यंगचित्र आणि पोस्टर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पुण्यातील टिळक चौकातील अलका टॉकीजजवळ झळकविण्यात आले. या बॅनरची बुधवारी शहरभर चर्चा होती.
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराच्या विडंबन गीताच्या प्रकरणावरून मिंधे गटाची पाचावर धारण बसली आहे. पुण्यात शिवसेनेच्या वतीने मिंध्यांचे व्यंगचित्र झळकावून त्याखाली लिहिलेला मजकूर लक्षवेधी ठरला आहे. दिवसभर हा बॅनर अनेक पुणेकर थांबून, जवळ जाऊन बघत होते. त्यावर प्रतिक्रियादेखील देत होते. भैरव सर्जेराव यांनी रेखाटलेले हे व्यंगचित्र संपूर्ण पुणे शहरात चर्चेचा विषय बनले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List