…तर उद्धव ठाकरेसह भाजपा असती सत्तेत? ती एक चूक नि युती फिस्कटली, फडणवीस यांचा कोणता मोठा गौप्यस्फोट

…तर उद्धव ठाकरेसह भाजपा असती सत्तेत? ती एक चूक नि युती फिस्कटली, फडणवीस यांचा कोणता मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला. एकसंघ शिवसेनेशी युती झाली असती तर आताची स्थिती वेगळी असती, असे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये शिवसेनने त्यावेळी ती एक राजकीय चूक केली नसती तर आज उद्धव ठाकरे यांचा पक्षही फुटला नसता आणि युती पण तुटली नसती. त्यांनी मागील दहा वर्षांतील आठवणींना उजळा देताना त्या एका चुकीमुळे आणि पाच जागांच्या खेळीमुळे राज्यातील राजकारणाने मोठी कूस बदल्याकडे लक्ष वेधले

या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीतील काही गोटातील किस्से बाहेर आणले. त्यावेळी शिवसेनेसोबत जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यावेळी 151 जागावर अडून बसली. तर भाजपा 127 आणि शिवसेना 147 जागांवर लढण्याची तयारी करत होती. तर उर्वरीत जागा या मित्र पक्षांना सोडणार होते. पण भाजपचा हा प्रस्ताव शिवसेनेने
151 जागांपेक्षा एकही कमी जागा न घेण्याची भूमिका घेतली असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे पण ठरले

2014 सालची शिवसेना भाजप युती तुटण्याची इनसाईड स्टोरी प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणली. सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या सत्कार समारंभ वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. शिवसेनेला तेव्हा 147 जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलं होतं, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र उद्धव ठाकरे हे 151 वर ठाम राहिले आणि युती तुटली असे फडणवीस म्हणाले.

मग पक्षश्रेष्ठींनी काय घेतला निर्णय?

शिवसेनेसोबत आमची बोलणी सुरू होती. आम्ही त्यांना जास्त जागा द्यायला सुद्धा तयार होतो. त्यांनी आपल्या मनात 151 चा आकडा पकडला होता. तेव्हा ओमप्रकाश माथूर यांनी अमित शहा यांच्या सोबत बोलणं केलं आणि सांगितलं की अशाप्रकारे चालणार नाही. अमित शहा यांनी पंतप्रधान यांच्या सोबत बोलणं केलं आणि तेव्हा ठरलं की आम्ही 127 आणि ते 147 असा फॉर्म्युला ठरला तर होईल नाहीतर युती राहणार नाही.तेव्हा मी अमित शहा आणि ओमप्रकाश मधुर आम्ही आत्मविश्वास होता की आम्ही लढू शकतो. बाकी पक्षात कोणाला आत्मविश्वास नव्हता. या विश्वासाच्या जोरावर आम्ही शिवसेनेला अल्टिमेटम दिलं होते, असे फडणवीस म्हणाले.

मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं…

शिवसेनेला 147 जागा तर भाजपा 127 जागांवर लढणार होते. दोघांचेही मिळून 200 च्या वर आमदार निवडून येतील असे आम्हाला वाटत होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री तर आमचा उपमुख्यमंत्री बनेल, असे ठरले होते. पण विधाताच्या मनात काही वेगळंच होतं. मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं, असे फडणवीस म्हणाले.

युवराजामुळे युती तुटली?

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. पण त्यावेळी युवराज यांनी घोषणा केली की 151 जागा लढणार आणि त्यामध्ये एकही सीट कमी होणार नाही. उद्धव सेना कौरवांच्या मूडमध्ये आली होती. पाच गाव सुद्धा देणार नाहीत, असे ते म्हणत होते. आम्ही म्हटलं ठीक आहे, पाच गाव नाही देणार तर श्रीकृष्ण आमच्या सोबत होते. लढाई झाली, असे फडणवीस म्हणाले.

मी तेव्हा प्रचारात होतो पण पाठीशी ओम प्रकाश माथुर आणि अमित शहा होते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रेडिबिलिटीमुळे इतक्या कमी वेळात पहिल्यांदाच आम्ही 260 सीट लढलो, त्याआधी आम्ही 117 पेक्षा जास्त जागा लढलोच नाही. 260 जागा लढलो आणि तेव्हापासून आम्ही सगळ्यात मोठी पक्ष म्हणून उभा राहिलो आणि तेव्हापासून आजपर्यंत शंभरचा आकडा पार करणारी राज्यातील मागील 30 वर्षातील ही एकमेव पार्टी आहे, असे फडणवीस म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक; 3 दहशतवादी ठार तर, 3 जवानही शहीद जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक; 3 दहशतवादी ठार तर, 3 जवानही शहीद
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये गुरुवारी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. तर दहशतवाद्याचा खात्मा...
IPL 2025 – मिचेल मार्श आणि निकोलस पुरनचा वादळी धमाका, लखनऊचा हैदराबादवर 5 विकेटने विजय
मंत्रालयात प्रवेशासाठी अत्याधुनिक प्रणाली, आता मंत्रालयात जाताना अवलंबन करावी लागणार ही पद्धत
‘…तर आदित्य ठाकरे यांची देखील नार्को टेस्ट करायला पाहिजे’; दिशा सालियन प्रकरणात कदमांची मोठी मागणी
India Tour Of England- इंग्लंड दौऱ्यातून रोहित शर्मा आऊट? विराट कोहलीही मुकण्याची शक्यता
श्रीलंकेच्या नौदलाने 11 हिंदुस्थानी मच्छिमारांना केली अटक, बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याचा आरोप
Nanded News – गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन, काय आहे प्रकरण?