Pune crime news – ड्रायव्हरची नियत फिरली, पण पोलिसांनी चलाखी पकडली!
स्क्रॅप व्यावसायिक मालकाने विश्वासू कामगाराकडे पोहोच करण्यासाठी दिलेली 10 लाखांची रोकड पाहून त्याच कंपनीतील ड्रायव्हरची नीतिमत्ता फिरली. त्याने आपल्या साथीदाराला माहिती देऊन रोकड लुटून नेण्यास प्रवृत्त केले. मात्र, खडकी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार अवघ्या 6 तासांत दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 10 लाखांची रोकड, दुचाकी जप्त केली. ही घटना 25 मार्चला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खडकी बाजार परिसरात घडली होती.
चेतन मंगेश गोडसे (वय – 28) आणि आकाश कैलास माळी (वय – 25, दोघेही रा. भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आमिर सय्यद (वय – 66, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली.
सय्यद हे सुशील गोयल यांच्याकडे कामाला आहेत. त्यांनी १० लाख सय्यद यांच्याकडे देऊन भागीदाराला देण्यास सांगितले होते. त्यानुसार माळी आणि सय्यद मोटारीतून जात होते. आकाशने रोकडलुटीचा डाव रचला. त्याने चेतन गोडसेला माहिती देऊन रक्कम चोरून ने, असे सांगितले होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, रंजन कुमार शर्मा, मनोज पाटील, हिंमत जाधव, विठ्ठल दबडे, दिलीप फुलपगारे, गजानन चोरमले, दिग्विजय चौगले, संदेश निकाळजे, आशीष पवार, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, सुधाकर राठोड, सुधाकर तागड, दिनेश भोये, शशांक डोंगरे, प्रताप केदारी यांनी ही कामगिरी केली.
“स्क्रॅप व्यावसायिकाने भागीदाराला 10 लाखांची रोकड देण्यासाठी ज्येष्ठासह दोघांना गाडीतून पाठविले होते. मात्र, चालकाने साथीदाराला रोकडची माहिती देऊन लूट केली होती. पथकाने अवघ्या 6 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश करीत आरोपींना अटक केली.”
हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडल चार.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List