राज ठाकरे-उद्धव ठाकरे गुढीपाडव्याला एकत्र येणार? ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल

राज ठाकरे-उद्धव ठाकरे गुढीपाडव्याला एकत्र येणार? ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या सर्वच पक्षाकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना सर्वच मराठी माणसांकडून व्यक्त केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावे यासाठी आता मुंबईतील मराठी सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मुंबईतील मराठी सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या ३० मार्च रोजी ठाकरे बंधू मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी मराठी सेना पक्षाने दादर सेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले होते. त्यानिमित्ताने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवली आहे. ही निमंत्रण पत्रिका ठेवून बंधूत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. येत्या गुढीपाडव्याला हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलं जाणार आहे.

निमंत्रण पत्रिकेत काय?

बंधू मिलन निमंत्रण, भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार.
बंधू मिलन कार्यक्रम दिनांक ३० मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असे या निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. मोहनिश रविंद्र राऊळ यांनी ही निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ठेवली आहे.

invite

invite

“महाराष्ट्राला सध्या या दोघांची गरज”

“आज होळीचा सण आहे, त्यामुळे होळीला सर्व काही विसरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. बंधू बंधूसाठी धावून येतो. महाराष्ट्राला सध्या या दोघांची गरज आहे. तसेच एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. मराठी माणूस मराठी माणसासोबत भांडतो. दोन गटात विभाजन झाले आहे. दोन ठाकरे ब्रँड वेगळे झाले आहेत. जर ते एकत्र आले तर कुठेतरी मराठी माणसाला किंवा विविध कामगार सेनेला बळ मिळेल”, अशी भावना मोहनिश रविंद्र राऊळ यांनी व्यक्त केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपूरात दरवर्षी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधन करीत असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत...
IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट; पुढील 24 तास धोक्याचे, आयएमडीकडून मोठी बातमी
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; 2100 रुपयांबाबत आतली बातमी समोर
मुंबईत भीषण अपघात, कार एकमेकांवर आदळल्या; दोघांचा मृत्यू
‘सैतानाने मला कधी विवस्त्र केले कळाले नाही’, मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य
उसाचा किंवा द्राक्षांचा रस नाही तर प्या चंदनाचं सरबत, दिसतील चमत्कारिक फायदे, कसं बनवायचं पाहा
तुमची त्वचा कोरडी आहे? हे घरगुती टोनर सर्वोत्तम, त्वचेच्या समस्या लवकरच होतील दूर