भयानक ! नो पार्किंगमध्ये उभा केला सिलिंडरचा ट्रक, एकामागोमाग एक स्फोटाने मुंबईतकर हादरले
मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. काल रात्री सिलेंडर नेणारा एक ट्रक धारावीतील एका भागात नौ पार्किंगमध्येच पार्क करण्यात आला होता. आणि रात्रीच्या सुमारास त्या ट्रकमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे ट्र्कमधील इतर सिलेंडर्सचाही एकामागोमाग स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितलं. एकूण 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा भडका उडाला आणि आजूबाजूच्या शंभर मीटर पर्यंत उभ्या असलेल्या गाड्या तसेच ट्रकही आगीत भस्मसात झाले. 24 तासांपूर्वी भडकलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात उडलेले सिलेंडरचा शोध घेऊन सिलेंडर वर पाणी मारत कुलिंग करायचं काम सुरु आहे.
मात्र या आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण; नागरिक घर सोडून सुरक्षित ठिकाणी धावले.
8 जणांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान धारावी सिलिंडर स्फोट प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध पार्किंग करणाऱ्या इतर 7 ते 8 जणांवर वेगवेगळ्या कलमंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक बेकायदेशीर डबल पार्किंगमध्ये उभा असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या सिलिंडर ट्रकच्या व्यतिरिक्त आणखी काही गाड्या बेकायदेशीर पार्किंगमध्ये होत्या त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. तसेच गॅस सिलिंडर सप्लाय करणारे निनाद केळकर आणि इतर वाहनचालकांवर गुन्हा दाखल झाला असून या रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगसाठी पैसे घेणारे तरबेज शेख आणि जब्बार शेख दोघांनाही पोलिसांनी आरोपी बनवले.
नो पार्किंगमध्ये सिलिंडरची गाडी लावल्याने नागरिकांचा जीव धोक्यात
मिळालेल्या माहितीनुसार, सायन PNGP कॉलनीत काल रात्री झाला सिलेंडर स्फोटाची भीषण घटना घडली. नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आयसर गाडीत मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवलेले होते, त्यातील एकाचा स्फोट झाल्यामुळे एकामागोमाग स्फोटांची मालिका सुरू झाली. त्यामुळे आजूबाजूच्या शंभर मीटर पर्यंत उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान झाले आणि ट्रकही आगीत भस्मसात झाले. अग्निशमन दलाचे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. जीवितहानी झाली नसली तर बराच परिसर जळून खाक झाला आहे. स्फोटानंतर इतर नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत इतर गाड्या लगेच बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून 283 सिलेंडर पोलिसांनी जप्त करून धारावी पोलिस ठाण्यात हलवले आहेत. नेचर पार्क परिसरात अजूनही सिलेंडर असण्याची शक्यता; शोधमोहीम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, त्यामागचे कारण शोधण्यासाठी फायर ब्रिगेड आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.
रात्रीच्या वेळेस सिलेंडरच्या एकामागोमाग स्फोटांमुळे कानठळ्या बसवणारा आवाज झाले आणि स्थानिक नागरिकांच्या मनात दहशत माजली. लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्व जण जीव मुठीत धरून जगत होते. सध्या संपूर्ण परिसरातील नागिरकांच्या मनात भीती असून लोकांनी त्यांचं राहतं घर सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली आहे. स्फोट झालेल्या गाडीची अवस्थाही अतिशय भयानक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List