आधी मुलीला 29 व्या मजल्यावरून खाली फेकलं, मग आईनेही मारली उडी, पनवेल हादरलं

आधी मुलीला 29 व्या मजल्यावरून खाली फेकलं, मग आईनेही मारली उडी, पनवेल हादरलं

पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.  एका महिलेनं आपल्या आठ वर्षांच्या मुलीला 29 वाव्या मजल्यावरून खाली फेकलं आणि त्यानंतर स्वत: देखील उडी मारली.  या घटनेत दोघींचा देखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की हा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये असलेल्या पळस्पे परिसरातील मॅरेथॉन नेक्सन ओरा बिल्डिंगमध्ये घडला आहे. मैथिली दुवा असं या महिलेचं नाव आहे. या महिलेचं मानसिक स्वस्थ ठिक नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यातच तीनं आपल्या आठ वर्षांच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकलं. त्यानंतर तीने देखील उडी मारली. या घटनेत दोघींचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ही महिला मानसिक दृष्या आजारी असल्यानं तीनं टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेनं खळबळ 

ही घटना पनवेलमधील पळस्पे परिसरातील मॅरेथॉन नेक्सन ओरा बिल्डिंगमध्ये घडली आहे. या बिल्डिंगमध्ये आशिष दुवा वय 41 हे आपल्या कुटुंबासोबत राहातात. त्यांची पत्नी मैथिली दुवा यांनी 29 व्या मजल्यावरून उडी मारत आपलं आयुष्य संपवलं आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्या आठ वर्षांच्या मुलीला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकलं, या घटनेत तिचा देखील मृत्यू झाला आहे.  त्या मानसिक दृष्या आजारी होत्या अशी माहिती समोर येत आहे. यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं, असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. आईचा आणि मुलीचा एकाचवेळी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वीज स्वस्त! टाटा पॉवरची वीजदरात कपात, मुंबईकरांना मोठा दिलासा वीज स्वस्त! टाटा पॉवरची वीजदरात कपात, मुंबईकरांना मोठा दिलासा
मोठी बातमी समोर येत आहे. वीजदरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत.  महाराष्ट्र...
मोठी बातमी! तेलंगणामध्ये कारचा भीषण अपघात; मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचा मृत्यू
राजघराण्यातील मुलगी… बॉलिवूड पदार्पण करताच झाली स्टार, फक्त एका MMS स्कँडलमुळे रातोरात करिअर उद्ध्वस्त
व्यंग आणि शिवीगाळ यात फरक आहे कुणाल कामराबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
मला 50 व्या वर्षापर्यंत भरपूर रोमान्स, अफेअर्स हवेत; पती अन् मुलीने नातं तोडलेली अभिनेत्री कोण?
8 कोटीची रोल्स रॉयल्स, 2 कोटीत विकली! कोरटकरसह मोतेवार प्रकरणाची स्वतंत्र चौकशी हवी, रोहित पवार यांची मागणी
विवाहबाह्य संबंधांना विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी, पीडित पतीची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना