सैफ अली खान नाही तर, ‘या’ दिग्गज नेत्यावर फिदा होती करीना, लपून करायची असं काम

सैफ अली खान नाही तर, ‘या’ दिग्गज नेत्यावर फिदा होती करीना, लपून करायची असं काम

Kareena Kapoor Love Life: अभिनेत्री करीना कपूर खान अशा अभिनेत्रींपैकी एका, ज्याचं खासगी आयुष्य देखल फिल्मी करीयरप्रमाणे हीट राहिलं. आज करीनाला कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण करीनाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, जेव्हा बेबो मोठी बहीण करिश्मा कपूर हिच्या सारखी इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण करु शकेलं असं वाटलं नव्हतं. पण करीना तिच्या फिल्मी करीनर सोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली.

करीनाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता शाहिद कपूर याला डेट केल्यामुळे देखील करीना तुफान चर्चेत राहिली. करीनाच्या करीयरमध्ये अशी देखील एक वेळ आली जेव्हा अभिनेत्रीने एका दिग्गज नेत्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली. एका मुलाखतीत करीना हिने इच्छा व्यक्त केली होती.

करीना कपूर हिने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जगात कोणाला डेट करण्याची संधी मिळाली तर कोणाला डेट करशील अस प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला, यावर अभिनेत्री म्हणाली होती, ‘मला बोलायला हवं की नाही माहिती नाही. थोडं वादग्रस्त आहे. पण मला राहूल गांधी यांना डेट करायला आवडेल…’

पुढे करीना म्हणाली होती, ‘मी कायम लपून त्यांचा फोटो पाहत असते. मला वाटते की त्यांना जाणून घेणे किती मनोरंजक असेल. मी फिल्मी कुटुंबातून आली आहे आणि ते राजकीय कुटुंबातून आहेत, त्यामुळे कदाचित हे एक मनोरंजक संभाषण असेल.’

राहूल गांधी यांना डेट करण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या अनेक वर्षांनंतर करीनाला विचारण्यात आलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘ते वक्तव्य फार जुनं आहे. आमचे आडनाव प्रसिद्ध आहेत, म्हणून मी इच्छा व्यक्त केली होती…’, करीना आज तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पण अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात.

सांगायचं झालं तर, करीना हिने अनेक वर्ष शाहिद कपूर याला डेट केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखरे 2007 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर करीनाच्या आयुष्यात अभिनेता सैफ अली खान याची एन्ट्री झाली.

‘टशन’ सिनेमाच्या सेटवर करीना आणि सैफ अली खान यांची ओळख झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ आणि करीना यांनी लग्न केलं. लग्नानंतर करीना हिन तैमूर आणि जेह यांना जन्म दिला. सोशल मीडिया करीनाच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

15 वर्षांनी लहान अभिनेत्रीसाठी पत्नीलाही सोडायला तयार होता रोहित शेट्टी? कोण आहे ती? 15 वर्षांनी लहान अभिनेत्रीसाठी पत्नीलाही सोडायला तयार होता रोहित शेट्टी? कोण आहे ती?
बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींमध्ये लव्ह-हेट रिलेशनशिप पहायला मिळतं. इंडस्ट्रीत एका क्षणात ब्रेकअप आणि पॅचअपचे खेळ खेळले जातात. यात केवळ अभिनेता आणि...
‘छावा’ सिनेमामुळेच नागपूरमध्ये राडा, ‘ही’ व्यक्ती जबाबदार, स्वरा भास्कर म्हणाली, ‘मुर्ख…’
राज बब्बरच्या मुलाने हटवलं वडिलांचं आडनाव; सावत्र भावाने मारला टोमणा “नाव बदलल्याने..”
यंदा उन्हाळ्यातही अभ्यासाला सुट्टी नाही! शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन अध्यापन करावे लागणार
बीडमधील आमदारावर आरोप अन् अपहरण, पोलिसांची उडाली धावपळ
मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मागितली 50 रुपयांची खंडणी, पैसे देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्याचा भाजीपाला आठवडे बाजारातून पळवला
मानलेल्या भावासह प्रियकराचा विवाहितेवर सामूहिक अत्याचार, बार्शीत नात्याला काळिमा फासणारी घटना