सी लिंकवर टोल ऑपरेटरला 200 मीटर फरफटत नेले
टॅक्सी चालकाने वांद्रे – वरळी सी लिंकवरील टोल बूथ चालकाला 200 मीटर फरफटत नेल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात टॅक्सी चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पळून गेलेल्या टॅक्सी चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या सोमवारी दुपारी एक टॅक्सी सी लिंकच्या वांद्रे येथील बाजूने टोल बायपास करून वरळीच्या दिशेने जात होती. तेव्हा टोल चालकाने त्या टॅक्सी चालकाला थांबण्यास सांगितले. त्या टॅक्सी चालकाने वाहनाचा वेग वाढवला. सुपरवायझरने टॅक्सी अडवली. तेव्हा त्या टॅक्सी चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे तो खाली पडला. तो टायर आणि बोनेटमध्ये अडकला. त्यानंतरदेखील टॅक्सी चालकाने ब्रेक मारला नाही. त्याने टोल बूथ चालकाला फरफटत नेले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. जखमी टोल बूथ चालकावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List