संविधानाची पायमल्ली केली जात आहे, सत्ताधाऱ्यांनी अंतर्मुख व्हावे; विजय वडेट्टीवार यांनी सुनावले

संविधानाची पायमल्ली केली जात आहे, सत्ताधाऱ्यांनी अंतर्मुख व्हावे; विजय वडेट्टीवार यांनी सुनावले

देशाचे नागरिक म्हणून आपल्याला काय अधिकार आहेत, आपली कर्तव्य काय आहे हे आपल्याला संविधानाने शिकवले. कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा म्हणून सर्वश्रेष्ठ असलेला ग्रंथ संविधान आहे, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित संविधानाची गौरवशाली वाटचाल या प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर महात्मा गांधी यांनी सुचवले होते ,देशाच्या संविधान बनवण्याची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात यावी. सगळ्यात जास्त पदवी घेतलेले आणि विद्वान असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे प्रमुख बनले.

आपल्या संविधानाचा पायाच संतांच्या शिकवणूकीतून आला आहे. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता, आणि सामाजिक विषमता यांना विरोध केला. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी आत्मोन्नती आणि विवेकवादाचा पुरस्कार केला. संविधानाच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य यांना मान्यता दिली आहे. संत जनाबाई आणि संत बहिणाबाई यांनी महिलांच्या सन्मानाचा पुरस्कार केला. याचेही प्रतिबिंब संविधानात आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

मराठी साहित्य संलेनाच्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांनी आपल्या भाषणात पुरोगामी महाराष्ट्र आणि संत परंपरेची आठवण करून दिली. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये पुरोगामी विचारसरणीतून निष्पन्न झालेली आहेत. आणि तेच संविधानात दिसते. फुरोगामी म्हणून हेटाळणी करणाऱ्याना मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी सत्य बोलून दाखवले, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

आता मात्र संविधानाची पायमल्ली केली जात आहे. महाराष्ट्रात याची सुरुवात एका राज्यपालानी केली. राज्यातील सर्वोच्च पदावर बसून त्यांनी राजकीय निर्णय घेतले, राजकीय वक्तव्यं केली. या राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांच्याबाबत अश्लाघ्य वक्तव्य केले. यानंतर दोन पक्ष फोडून महायुती सरकार आले,या प्रकरणी तीन वर्ष झाले तरी कोर्टात निकाल आलेला नाही.

संविधानात अनेक मूलभूत तत्व आहेत त्यातील मूलभूत तत्व म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव. बाबासाहेबांनी राजकारण आणि धर्म वेगळा रहावा यावर जोर दिला. त्यानुसार सरकार आणि सरकारी यंत्रणांनी सर्वांशी समान वागणे अपेक्षित आहे, पण आपल्या राज्यात संविधानाची शपथ घेऊन एका समाज विरोधात सतत द्वेषपूर्ण विधान करत आहे. हे संविधानाला छेद देणारे आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रात आज कोणत्याही महापालिकेत लोकनियुक्त शासन नाही, लोकप्रतिनिधी नाही, निवडणुका होत नाही ही संविधानाची पायमल्ली आहे असे वडेट्टीवार म्हणाले. भारतीय लोकशाही मजबूत आहे,पण सध्या मात्र द्वेषाच्या वातावरणात संविधानाला धोका निर्माण होत आहे.त्यामुळे संविधानाला बदलता येणार नाही,जे असा प्रयत्न करतील त्यांची सत्ता बदलली जाईल, असे वडेट्टीवार आपल्या भाषणात म्हणले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या देठाला ही हात लावू नये, शत्रूच्याही निष्पाप स्त्रीचा सन्मान करावा हे शिकवले.त्याचवेळी स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला आणि मृत्यूनंतर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच आहे ही देखील छत्रपतींची शिकवण आहे. ती कबर महाराष्ट्राच्या शौर्याची, लढाऊ बाण्याची खूण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे बीज पेरले ती कबर त्याची अभिव्यक्ती आहे. जी कबर मराठी बाण्याचे प्रतीक आहे,ते थडगे तोडून तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा,संघर्षाचा इतिहास पुसायचा आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा… इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक पॅरीडी साँग्ज गायल्याने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या खार येथील स्टुडिओ सोमवारी सायंकाळी शिवसैनिकांनी...
IPL 2025 – चौकार अन् षटकारांच्या आतषबाजीत पंजाबचा विजयी धमाका, गुजरात पराभूत
सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक, व्हिडीओ व्हायरल
राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, बी एच पालवे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
विहिरीच्या खोदकामादरम्यान भीषण अपघात, दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
वर्गात बडबड करत होती म्हणून पाचवीच्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, शिक्षिकेवर गुन्हा दाखल
खेड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, कोकण रेल्वे ठप्प; दीड तासांनी वाहतूक सुरळीत