Jalna News – जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Jalna News – जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

जालन्यात अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी निधीची तरतूद करून तातडीने निधी वितरित करण्याची मागणीसाठी एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पोलिसांनी एका महिला शिक्षिकेसह चार ते पाच पुरुष शिक्षकांना ताब्यात घेतले आहे.

जालन्यात मंगळवारी अंशतः अनुदानित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी खबरदारी म्हणून अग्निशमन दलाचा एक बंब ही जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर तैनात ठेवण्यात आला होता.

विना अनुदानित शिक्षकांना 20 टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा देण्यात यावा असा 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णय निर्गमित केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं या अर्थसंकल्पात यासाठी कुठलीच तरतूद केलेली नाही. यासाठी विना अनुदानित शिक्षकांच्या वतीने आंदोलनं केली गेली. मात्र अद्याप यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार 63 हजार शिक्षकांच्या मागण्यांना आपण का गांभीर्याने घेत नाही हा प्रश्न समस्त विनाअनुदानीत शिक्षकांना पडला आहे. शिक्षकांवर अर्थ खात्यांकडून वेळोवेळी अन्याय होत आहे. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री सकारात्मक आहेत. आता अर्थमंत्री अजित पवारांकडे शिक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. येत्या दोन दिवसात अर्थमंत्री आजित पवारांनी आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर आख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी शिक्षकांनी दिला. यावेळी जिल्हाभरातून शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी...
काश्मिरात संगमनेरचे जवान रामदास बढे शहीद
पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले 507 कोटी रुपये
पालिका गुढीपाडव्याला पुरणपोळी देणार
30 वर्षे झाली तरी… रेवस ते रेडी सागरी महामार्ग अपूर्णच
कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंग करताना तांत्रिक अडचणी, वकिलांचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र
हे सभागृह प्रशांत बंबच्या बापाचे नाही! अभिजीत वंजारी संतापले