GT Vs PBKS – नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलचा डंका, इतिहास रचण्याची संधी

GT Vs PBKS – नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलचा डंका, इतिहास रचण्याची संधी

IPL 2025 ची दणक्यात सुरुवात झाली आहे. षटकार आणि चौकारांची आतषबाजी चाहत्यांना पहायला मिळत आहे. सोमवारी (24 मार्च 2025) झालेल्या दिल्ली आणि लखनऊ सामन्यात आशुतोष शर्माच्या झंझावातात लखनऊचे पानीपत झाले आणि हातचा सामना लखनऊला गमवावा लागला. मंगळवारी (25 मार्च 2025) गुजरात आणि पंजाब किंग्ज अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्यात सर्वांच्याच नजरा दोन्ही धडाकेबाज कर्णधारांवर असणार आहे. तसेच या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे.

आयीपएलच्या 17 व्या हंगामात KKR ला चॅम्पियन बनवणारा कर्णधार श्रेयस अय्यर यंदाच्या हंगामात पंजाबचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्याचबरोबर शुभमन गिलची नजर सुद्धा गुजरातला चॅम्पियन बनवण्यावर असेल. दोघेही तोडफोड फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात चाहत्यांना दोन्ही बाजूंनी चौकार आणि षटकारांची आतषबाजी पहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला नरेंद्र मोदी स्टेडिमयवर इतिहास रचण्याची संधी आहे.

Ashutosh Sharma story – 8 वर्षांचा असताना घर सोडलं, लोकांचे कपडे धुतले; अम्पायरिंगचं कामही केलं, 11 चेंडूत 46 धावा चोपत एका रात्रीत ‘हिरो’ झाला

घरच्या मैदानावर खेळताना शुभमन गिलचा खेळ दमदार राहिला आहे. त्याने आतापर्यंत नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळताना 18 आयपीएल सामन्यांमध्ये 63.53 च्या सरासरीने सर्वाधिक 953 धावा चोपून काढल्या आहेत. म्हणजेच त्याला 1000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी फक्त 47 धावांची गरज आहे. विशेष म्हणजे शुभमन गिल एकमेव फलंदाज आहे ज्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमयवर सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने या मैदानात 3 शतके आणि 4 अर्धशतके ठोकली आहे. या बाबतीतत शुभम गिलनंतर साई सुदर्शन (603 धावा), अजिंक्य रहाणे (336 धावा), डेव्हिड मिलर (308 धावा) आणि रिद्धिमान सहा (290 धावा) या खेळाडूंचा समावेश आहे.

Who is Vipraj Nigam – आयपीएलमध्ये लखनऊविरुद्ध ‘भौकाल’ उडवणारा विपराज निगम कोण आहे?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा… इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक पॅरीडी साँग्ज गायल्याने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या खार येथील स्टुडिओ सोमवारी सायंकाळी शिवसैनिकांनी...
IPL 2025 – चौकार अन् षटकारांच्या आतषबाजीत पंजाबचा विजयी धमाका, गुजरात पराभूत
सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक, व्हिडीओ व्हायरल
राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, बी एच पालवे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
विहिरीच्या खोदकामादरम्यान भीषण अपघात, दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
वर्गात बडबड करत होती म्हणून पाचवीच्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, शिक्षिकेवर गुन्हा दाखल
खेड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, कोकण रेल्वे ठप्प; दीड तासांनी वाहतूक सुरळीत