खेड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, कोकण रेल्वे ठप्प; दीड तासांनी वाहतूक सुरळीत
खेड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेत अखेर दीड तासांनी वाहतूक सुरू केली. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकातच थांबवून ठेवण्यात आली होती. तर चंदीगडला जाणाऱ्या गोवा संपर्कक्रांती एक्सप्रेसला अंजणी स्थानकात थांबवून ठेवण्यात आले होते. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत करत गाड्या रवाना करण्यात आल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List