वयाच्या १४व्या वर्षी ५५ वर्षीय मोलकरणीशी शारीरिक संबंध होते; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक दावा

वयाच्या १४व्या वर्षी ५५ वर्षीय मोलकरणीशी शारीरिक संबंध होते; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक दावा

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी अक्षरश: एक काळ गाजवला होता. आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत ते दुसरे तिसरे कोणी नसून ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी आहेत. लोकांच्या मनात ओमपुरी यांच्याविषयी एक वेगळी भावना आहे. पण ओम पुरी यांच्या खासगी आयुष्यात नेहमी वाद सुरु होते. त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर एक पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

ओम पुरी यांचा जन्म हरियाणातील अंबाला गावात एका पंजाबी कुटुंबात झाला. सुरुवातीच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती ही बिकट होती. ते कोळसा विकून आपले पोट भरत असत. कुटुंबीयांची जबाबदारी असल्यामुळे ओम पुरी यांना शिक्षण घेता आले नाही. तरीही त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आणि नॅशनल स्कूल ड्रामामध्ये अभियाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मेहनतीच्या जोरावर त्यांना सरकारी नोकरी मिळाली पण सिनेमात काम करण्यासाठी त्यांनी ती सोडली. त्यांनी ठरवलेलं की एकदा प्रयत्न करुन पाहायचा. नाहीच काही झाले तर पुन्हा ढाब्यावर भांडी घासायची.

वाचा: बर्थडेला केकसाठी पैसे नव्हते म्हणून रसमलई कापून…; परिणितीची संघर्ष कथा ऐकून नेटकरी हैराण

ओम पुरी यांच्या पत्नीने एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकामध्ये त्यांनी ओम पुरी यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक खळबळजनक खुलासे केले होते. त्यांनी लिहिले होते की, वयाच्या १४व्या वर्षी ओम पुरी यांचे घरात काम करणाऱ्या ५५ वर्षांच्या मोलकरणीशी लैंगिक संबंध होते. ओम पुरी यांची पत्नी नंदी म्हणाल्या की अनेकदा ओम पुरी मामाच्या घरी जायचे. तिकडे काम करणाऱ्या ५५ वर्षीय मोलकरणीच्या ते प्रेमात पडले होते. एके दिवशी घरातील दिवे गेले. संधी पाहून १४ वर्षांच्या ओम पुरी यांनी मोलकरणीला पकडले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

ओम पुरींचे पहिले प्रेम हे मामाच्या घरी काम करणारी मोलकरीण होती. तसेच नंदीता यांनी सांगितले की ओम पुरी हे कायम वयाने त्यांच्यापेक्षा मोठ्या महिलांकडे आकर्षिच व्हायचे. ओम पुरी यांच्या जीवनावर आधारित या पुस्तकाचे नाव ‘असाधारण नायक ओम पुरी’ असे होते. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ओम पुरी आणि त्यांच्या पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळाच्या काळजीने आईचे काळीज का कठोर झाले?, पोटावर विळ्याचे ६५ चटके, अखेर देवदूत म्हणून डॉक्टरचे पुढे आले…. बाळाच्या काळजीने आईचे काळीज का कठोर झाले?, पोटावर विळ्याचे ६५ चटके, अखेर देवदूत म्हणून डॉक्टरचे पुढे आले….
हृदयाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या 22 दिवसांच्या चिमुकल्याला अंधश्रद्धेतून त्याच्या आईने चक्क पोटावर चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.आता याच...
बॉलीवूड देखील पॉलिटीकलदृष्ट्या विभागला गेला आहे का? काय म्हणाली यामी गौतम ?
सरकारी बाबूंचा ‘लंच टाईम’ फक्त अर्ध्यातासाचा! जेवणाच्या नावाखाली कर्मचारी गायब असेल तर दाखवा “हे” परिपत्रक
आसाराम बापूचा अंतरिम जामीन आणखी 3 महिन्यांसाठी वाढवला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय कर्मचारी आणि संस्थांना सुट्टी जाहीर
मिलिंद सोमणच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट, धक्कादायक खुलासा समोर
‘एक नंबर घमेंडी…’, अभिनेत्रीने स्टेजवर येताच केलं असं काही; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल