‘मन्नत’ नाही सांभाळू शकला शाहरुख खान? कायद्याच्या कचाट्यात अडकला किंग खानचा बंगला, काय आहे प्रकरण

‘मन्नत’ नाही सांभाळू शकला शाहरुख खान? कायद्याच्या कचाट्यात अडकला किंग खानचा बंगला, काय आहे प्रकरण

Shah Rukh Khan Mannat In Legal Issues: अभिनेता शाहरुख खान याचा आलिशान ‘मन्नत’ बंगला कोणत्या टूरिस्ट प्लेसपेक्षा कमी नाही. अभिनेत्याचे चाहते कायम त्याच्या बंगल्या बाहेर उभे राहून फोटो आणि व्हिडीओ काढत असतात. एवढंच नाही तर अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी शाहरुखच्या बंगल्याबाहेर उभी असते. पण आता शाहरुख खान याचा ‘मन्नत’ बंगला कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.

शाहरुख खान आणि गौरी खान यांनी त्यांच्या घराला आणखी आलिशान बनवण्यासाठी नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यापूर्वीच त्यांचं घर कायदेशीर अडचणीत अडकलं आहे. शाहरुख खानचा बंगला ​​मन्नत ग्रेड III हेरिटेज स्ट्रक्चरच्या यादीत समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत या बंगल्यात कोणत्याही प्रकारचे संरचनात्मक बदल करण्यासाठी सुपरस्टारला प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

बार अँड बेंचच्या म्हणण्यानुसार, सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी एनजीटीला पत्र लिहून शाहरुख खान आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने मन्नतमधील नूतनीकरणासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनच्या परवानगीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

किंग खान याच्यावर आरोप केल्यानंतर एनजीटीने संतोष दौंडकर यांना शाहरुख खानवरील आरोपांबाबत पुरावे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावनी आका 23 एप्रिल रोजी होणार आहे.

दरम्यान, न्यायिक सदस्य दिनेश कुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या समितीने सांगितलं- ‘प्रकल्प प्रस्तावक किंवा MCZMA द्वारे योग्य प्रक्रियेचे उल्लंघन झाल्यास, अपीलकर्त्याला चार आठवड्यांच्या आत योग्य पुराव्यासह ते सिद्ध करावे लागेल, असे न केल्यास या न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल प्रवेशाच्या टप्प्यावरच अपील फेटाळण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाड्याच्या घरात शिफ्ट होणार शाहरुख खान…

सांगायचं झालं तर, शाहरुख खान त्याच्या मन्नत या सहा मजली बंगल्यात आणखी दोन मजले वाढवण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘मन्नत’ बंगल्याच्या नूतनीकरणासाठी किंग खान जॅकी भगनानीच्या अपार्टमेंटमध्ये भाड्याने शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळाच्या काळजीने आईचे काळीज का कठोर झाले?, पोटावर विळ्याचे ६५ चटके, अखेर देवदूत म्हणून डॉक्टरचे पुढे आले…. बाळाच्या काळजीने आईचे काळीज का कठोर झाले?, पोटावर विळ्याचे ६५ चटके, अखेर देवदूत म्हणून डॉक्टरचे पुढे आले….
हृदयाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या 22 दिवसांच्या चिमुकल्याला अंधश्रद्धेतून त्याच्या आईने चक्क पोटावर चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.आता याच...
बॉलीवूड देखील पॉलिटीकलदृष्ट्या विभागला गेला आहे का? काय म्हणाली यामी गौतम ?
सरकारी बाबूंचा ‘लंच टाईम’ फक्त अर्ध्यातासाचा! जेवणाच्या नावाखाली कर्मचारी गायब असेल तर दाखवा “हे” परिपत्रक
आसाराम बापूचा अंतरिम जामीन आणखी 3 महिन्यांसाठी वाढवला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय कर्मचारी आणि संस्थांना सुट्टी जाहीर
मिलिंद सोमणच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट, धक्कादायक खुलासा समोर
‘एक नंबर घमेंडी…’, अभिनेत्रीने स्टेजवर येताच केलं असं काही; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल