ईदी घेण्यासाठी उडाली झुंबड; अव्यवस्थेमुळे भाजप नेत्यांचा कार्यक्रमातून काढता पाय

ईदी घेण्यासाठी उडाली झुंबड; अव्यवस्थेमुळे भाजप नेत्यांचा कार्यक्रमातून काढता पाय

स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणावणारा भाजप 32 लाख मुस्लिमांना ईदची भेट म्हणजेच ईदी देणार आहे. या भेटवस्तूंना सौगत ए मोदी असे नाव देण्यात आले आहे. नवी दिल्लीत याचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भेटवस्तू म्हणजे ईदी घेण्यासाठी मुस्लिम महिलांची एकच झुंबड उडाली. कार्यक्रमातील अव्यवस्थेमुळे भआजप नेत्यांनीच या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

नवी दिल्लीतील सौगत ए मोदी कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. या कार्यक्रमात भेटवस्तू घेण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच भेटवस्तू घेण्यासाठी महिलांनी थेट व्यासपीठावरच धाव घेतली. त्यामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ पाहून भाजप नेतेही कार्यक्रम सोडून गेले. भाजपने ईदनिमित्त देशभरातील 32 लाख मुस्लिमांना सौगत-ए-मोदी किट देण्याची घोषणा केली आहे. ही मोहीम भाजप अल्पसंख्याक आघाडी चालवत आहे. त्यासाठी पक्षाचे 32 हजार पदाधिकारी सुमारे 32 हजार मशिदींशी संपर्क साधतील.

दिल्लीतील सौगत-ए-मोदी कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. या कार्यक्रमात ईदी घेण्यासाठी महिलांनी थेट स्टेजवरच धाव घेत प्रचंड गर्दी केली. स्टेजवरून वारंवार घोषणा करूनही महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि गर्दी वाढतच गेली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सौगत-ए-मोदी मोहिमेची सुरुवात करण्यासाठी, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी आणि आघाडीचे प्रभारी आणि भाजप सरचिटणीस दुष्यंत गौतम व्यासपीठावर आले. किट्स घेण्यासाठी महिलांची इतकी मोठी गर्दी व्यासपीठावर जमली होती की प्रभारी दुष्यंत गौतम देखील कार्यक्रम सोडून निघून गेले.

भाजप सौगत-ए-मोदीला एक मोठी योजना म्हणत असताना, विरोधक त्यावर निशाणा साधत आहेत. मोदींच्या भेटवस्तूबद्दल तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद म्हणाले की, भाजपकडे दाखवण्यासाठी काहीही नाही. तुम्ही कधी मगरीचे तोंड पाहिले आहे का? जेव्हा तो तोंड उघडतो तेव्हा तो हसत असल्याचे दिसते, पण जर तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर तो तुम्हाला गिळंकृत करेल. भाजपचीही तीच अवस्था अशीच आहे. आता मुस्लिमांना खूश करण्यासाठी त्यांनी मोदींची भेट दिली आहे. जगाला भाजपच्या कारस्थानांची जाणीव आहे. त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काहीही नाही,अशी टीका त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kunal Kamra Controversy – काट डालेंगे तुम्हें! ‘गद्दार’ गीताने मिंधेंना चोपणाऱ्या कुणाल कामराला 500 हून अधिक धमकीचे फोन Kunal Kamra Controversy – काट डालेंगे तुम्हें! ‘गद्दार’ गीताने मिंधेंना चोपणाऱ्या कुणाल कामराला 500 हून अधिक धमकीचे फोन
स्टँड अप कॉमेडियन कुमाल कामरा याने ‘गद्दार’ गीतामधून मिंधेंना झोडपून काढले. हे ‘गद्दार’ गीत झोंपल्याने मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी खार येथील ‘हॅबिटेट’...
नासामध्येही कर्मचारी कपात; शास्त्रज्ञ, इंजिनीअर्सना लागली भविष्याची चिंता
लग्न केल्याने पत्नीचे मालक होत नाही; अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्यावरून अलाहाबाद हायकोर्टाचे ताशेरे
Mehul Choksi मेहूल चोक्सी आमच्याच देशात, बेल्जियमने दिली कबूली
‘हसीन दिलरुबा’ पाहून रचला कट
आयपीएल राऊंडअप – आवेश खान येतोय…
लक्षवेधक – ऑर्डरनंतर आयफोन 10 मिनिटांत घरी