छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलींमध्ये चकमक, कमांडरसह तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमध्ये दंतवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक झाली. या चकमकीत टॉप कमांडरसर तीन नक्षलवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केला. ठार झालेला नक्षली कमांडर सुधीर ऊर्फ सुधाकर ऊर्फ मुरली याच्यावर 25 लाखांचे इनाम होते.
दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी दंतेवाडा आणि विजापूरच्या जंगलात अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू केले. या ऑपरेशन दरम्यान नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली.
चकमकीत सुरक्षादलाने तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List