पालिका गुढीपाडव्याला पुरणपोळी देणार
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पालिकेकडून मुंबईकरांना घरपोच पुरणपोळी मिळणार आहे. महानगरपालिकेने 50 बचत गटांना एकत्र आणून ‘पुरणपोळी महोत्सव’ सुरू केला आहे. हे बचत गट ऑनलाईन प्रणालीचा वापर करून मुंबईकरांना गुढीपाडव्याला पुरणपोळी थेट घरपोच पाठवणार आहेत.
रोजगाराच्या शोधात असणाऱ्या आणि हाती कला असलेल्या महिलांना एकत्र आणून महानगरपालिकेने महिला बचत गट निर्माण केले आहेत. हे बचत गट कपडे, विविध पर्स, कापडी पिशव्या, आभूषणे, घरगुती वापराच्या वस्तू तयार करतात. आता या बचत गटांनी ऑनलाईन पटलावरही ठसा उमटविला आहे. पुरणपोळीची मागणी https://shgeshop.com या संकेतस्थळावर नोंदविता येणार आहे. यासाठी मुंबईकर 28 मार्चपर्यंत पुरणपोळीची मागणी नोंदवू शकतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी घरपोच मिळणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List