हम होंगे कंगाल… देश का सत्यानाश, माफी नाही… पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रीजवर; कुणाल कामराने पुन्हा चोपले
‘गद्दार’ गीत झोंबल्यामुळे मिंधेंनी आदळआपट, तोडफोड, शिवीगाळ, धमकी असे नाना प्रकार केले. मात्र स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने दहशतीपुढे न झुकता नवा व्हिडीओ पोस्ट करीत मिंधेंना पुन्हा चोपले. हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन, मन में हैं अंधविश्वास, देश का सत्यानाश… अशा खरमरीत शब्दांत नव्याने डिवचतानाच ‘माफी मागणार नाही. पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रीजवर…’ असे तगडे आव्हानही मिंधे गटाला दिले.
कुणाल कामराने गायलेल्या ‘ठाणे की रिक्षा… चेहरे पे दाढी… आंखो पे चष्मा, हाये…’ या गद्दार गीतामुळे मिंधे गट कमालीचा अस्वस्थ झाला आहे. कुणालच्या स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कायदेशीर कारवाईतून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मिंधेंच्या या दबावतंत्राला भीक न घालता कुणालने ‘हम होंगे कंगाल’ हा नवा व्हिडीओ पोस्ट केला आणि मिंधेंच्या गुंडागर्दीला तितक्याच रेट्याने जबरदस्त उत्तर दिले. सत्तेच्या जोरावर सुरू असलेल्या दडपशाहीमुळे देशाचे वाटोळे करण्याचे उपद्व्याप सुरू असल्याची नाराजी कुणालने नवीन गाण्यातून व्यक्त केली आहे. तसेच हॅबिटॅट स्टुडिओची केलेली तोडफोड आणि हल्ल्याचा निषेध केला आहे. मी माफी मागणार नाही. एखाद्या विनोदी कलाकाराच्या शब्दांसाठी एखाद्या स्थळावर हल्ला करणारा राजकीय पक्ष टोमॅटो वाहून नेणारा ट्रक उलटवण्याइतकाच हास्यास्पद आहे.
विकसित भारत का एक और एन्थम।
हम होंगे कंगाल… हम होंगे कंगाल…
हम होंगे कंगाल… एक दिन।
मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश।
होंगे दंगे चारो ओर… पुलिस के पंगे चारो ओर…
मन में नत्थूराम, हरकतें आसाराम,
होगा गाय का प्रचार लेके हाथों में हथियार,
होगा संघ का शिष्टाचार, जनता बेरोजगार,
गरीबी की कगार, हम होंगे कंगाल एक दिन।
मी गुंडागर्दीला घाबरणार नाही… लपणारही नाही. पलंगाखाली लपून हा वाद संपण्याची वाट पाहणारा नाही. जो राजकीय नेता मला धडा शिकवण्याची धमकी देईल त्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार केवळ शक्तिशाली आणि धनाढ्यांच्या ‘चापलुसी’साठी नाही हे ध्यानात घ्यावे. माझ्या पुढच्या शोसाठी मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील इतर कोणतीही जागा निवडेन, जी लवकर पाडण्याची गरज आहे, असे आव्हान देत कुणालने मिंधेंच्या तोडफोडीची चांगलीच खिल्ली उडवली. तसेच
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List