‘उदित की पप्पी…’, Kiss विवादावर उदित नारायण यांनी सोडलं मौन; म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी…’
Udit Narayan on Kissing Controversy: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक उदित नारायण ‘पप्पी’ शब्द ऐकल्यानंतर स्वतःलाच ट्रोल करताना दिसले. ज्यामुळे उदित नारायण आणि त्यांचं किस प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. सांगायचं झालं तर, उदित नारायण ज्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी गेले होते, त्या सिनेमाचं नाव ‘पिंटू की पप्पी’ असं आहे. ‘पप्पी’ शब्द ऐकताच उदित नारायण यांनी स्वतःच्या किसिंग प्रकरणावर मौन सोडलं.
उदित नारायण म्हणाले, ‘काय सिनेमाचं शिर्षक आहे… शिर्षक तरी बदलायला हवं होतं… पप्पी ठिक आहे… खूप चांगलं शिर्षक आहे तुमच्या सिनेमाचं ‘पिंटू की पप्पी’ पण ‘उदित की पप्पी को नही हैं?’ हा फक्त एक योगायोग आहे. जो कधीतरी होणारच होता…’ असं उदित नारायण म्हणाले.
किसिंग प्रकरणावर काय म्हणाले उदित नारायण?
ज्या व्हिडीओमुळे उदित नारायण वादाच्या भोवऱ्यात अडकले त्यावर व्हिडीओ म्हणाले, ‘सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो 2 वर्ष जुना आहे. तो व्हिडीओ ऑस्ट्रेलिया येथील आहे.’ यापूर्वी देखील उदित नारायण यांनी अनेकदा व्हिडीओ स्पष्टीकरण दिलं आहे.
यापूर्वी उदित नारायण एका मुलाखतीत म्हणाले, ‘मला यावर कोणताच पश्चाताप होत नाहीये. मी जे काही केलं मला नाही वाटतं त्यामध्ये काही वाईट आहे. माझं मन साफ आहे आणि लोकांना जर माझं आणि माझ्या चाहत्यांमधील प्रेम दिसत नसेल तर, मला त्यांचं वाईट वाटतं…’ असं देखील उदित नारायण म्हणाले होते.
व्हिडीओमध्ये उदित नारायण एका महिला चाहतीच्या ओठांना किस करताना दिसले. ज्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. लाईव्ह शो सुरु असताना उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या ओठांवर उदित नारायण यांनी किस केलं. शोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List