Aamir Khan- आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….
2022 मध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित झाल्यापासून, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. परंतु स्वस्थ बसेल तो आमिर कसला. आमिर यादरम्यान एका दुसऱ्या चित्रपटामध्ये व्यस्त होता. लवकरच आमिरला आपण बघणार आहोत ‘सितारे जमीन पर’ नावाच्या एका चित्रपटामध्ये. हा चित्रपट कधी येतोय याची आमिरचे चाहतेही उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
आमिर खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच ‘सितारे जमीन पर’ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर त्याने हा चित्रपट 2025 पर्यंत पुढे ढकलला. त्यानंतर त्याने अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, आता असे म्हटले जात आहे की आमिर त्याचा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित करणार आहे.
एका माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार, आमिर 30 मे रोजी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटगृहात प्रदर्शित करेल अशी अपेक्षा आहे. आधी तो जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत होता, पण आता त्याला वाटते की, 30 मे ही योग्य तारीख आहे. आता आमिर स्वतः कधी पुढे येऊन त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतो हे पाहणे इष्ट ठरणार आहे.
‘सितारे जमीन पर’चे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख देखील दिसणार आहे. हा चित्रपट आमिरच्या 2008 मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. काही काळापूर्वी आमिर या चित्रपटाबद्दल भाष्य केलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता, “हा ‘तारे जमीन पर’ चा सिक्वेल आहे, पण तो चित्रपट तुम्हाला रडवतो, पण हा चित्रपट तुम्हाला हसवेल. कथा पूर्णपणे वेगळी असेल. हा ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल आहे, पण त्यातील पात्रे वेगळी आहेत आणि परिस्थिती वेगळी आहे. हा ‘तारे जमीन पर’च्या थीमचा सिक्वेल आहे. हा विचारांचा सिक्वेल आहे. खरं तर, माझ्या मते, या चित्रपटाचा विचार दहा पावले पुढे आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List