ऑनलाईन गेमिंगच्या 357 वेबसाईट बंद
हिंदुस्थानात बेकायदेशीर चालणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केलीय. परदेशातून कार्यरत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या 357 वेबसाईट ब्लॉक करण्यात आल्या आहेत. तसेच जवळपास 2 हजार 400 बँक खातीसुद्धा गोठवण्यात आली असून जप्त करण्यात आली आहेत.
बॉलीवूड सेलिब्रिटी, प्रसिद्ध खेळाडू आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरनी अशा प्लॅटफॉर्म्सची जाहिरात केली तरी लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, याला बळी पडू नये, असे आवाहन अर्थ मंत्रालयाने केले आहे. सध्या 700 हून अधिक ई-गेमिंग कंपन्या डीजीजीआयच्या रडारवर आहेत. या कंपन्यांनी कोणत्याही प्रकारची नोंदणी केली नाही. तसेच या कंपन्या जीएसटीची चोरी करत आहेत. विदेशी कंपन्या बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. डीजीजीआयने एकूण 2 हजार 400 बँक खाती जप्त केली असून तब्बल 126 कोटी रुपये गोठवले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List