Who is Vipraj Nigam – आयपीएलमध्ये लखनऊविरुद्ध ‘भोकाल’ उडवणारा विपराज निगम कोण आहे?

Who is Vipraj Nigam – आयपीएलमध्ये लखनऊविरुद्ध ‘भोकाल’ उडवणारा विपराज निगम कोण आहे?

आयपीएलला तरुणांची लीग म्हणूनही ओळखली जाते. जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या लीगमध्ये खेळाडू आपले टॅलेंट दाखवून रातोरात स्टार होतात. आयपीएलच्या अठराव्या हंगामातील पहिल्या काही लढतीतच असे अनेक हिरो आपल्यासमोर आले आहेत. आधी मुंबईच्या विघ्नेश पुथुरच्या गोलंदाजीचे कौतुक झाले, तर आता दिल्लीच्या विपराज निगम याने सर्वांचे मन जिंकले आहे. आयपीएलमधील पदार्पणाच्या लढतीत 15 चेंडूत 39 धावांची विस्फोटक खेळी करत ऋषभ पंतच्या लखनऊ सुपर जायंट्स संघाची हवा टाईट करणारा हा विपराज नक्की आहे तरी कोण? असा सवाल क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्याच्याबाबत इंटरनेटवर उपलब्ध असणारी माहिती आपण जाऊन घेऊ…

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार अक्षर पटेल याने 20 वर्षीय विपराज निगमकडे चेंडू सोपवला आणि त्यानेही पहिल्याच षटकात एडम मारक्रमला बाद करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. गोलंदाजीत त्याच्या वाट्याला एकच विकेट आली असली तरी याची कसर त्याने फलंदाजीमध्ये भरून काढली.

आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विपराजने चौकार, षटकारांची आतषबाजी करत लखनऊच्या तोंडच्या विजयाचा घास हिरावला. बाद होण्यापूर्वी विपराजने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 260 च्या स्ट्राईक रेटने 39 धावा चोपल्या. विपराज एका बाजूने धावांची बरसात करत असल्याने आशुतोषलाही थोडी उसंत मिळाली. त्यानंतर आशुतोषने वादळी खेळी (नाबाद 66) करत संघाला विजयी केले.

वडील रिक्षाचालक, लोकल स्पर्धेत MI ने पोराला हेरले; IPL पदार्पणात CSK विरुद्ध 3 विकेट घेणारा विघ्नेश पुथुर कोण आहे?

विपराज निगम कोण आहे?

विपराज निगम याचा जन्म 28 जुलै, 2004 रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला. स्थानिक स्पर्धांमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले, पण त्याला खरी ओळख मिळाली ती सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळताना. त्याने उत्तर प्रदेशकडून खेळताना 8 विकेट घेतल्या होत्या. त्याला फलंदाजीमध्ये जास्त संधी मिळाली नाही, मात्र एका लढतीत त्याने 8 चेंडूत 27 धावांची खेळी करत संघाला 157 धावांचे लक्ष्य आरामात गाठून दिले होते.

विपराज हा एक लेग स्पिनर असून गरजेच्या वेळी खालच्या क्रमांकावर मोठे फटके मारण्याचे कसबही त्याच्याकडे आहे. लखनऊ विरूद्धच्या लढतीत त्याने आपल्या बॅटची जादू दाखवली. तो प्रथम श्रेणीचे 3 सामने खेळलेला असून यात त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 50 लाख रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले होते.

दिल्लीचा धमाका, आशुतोष शर्माच्या झंझावातात लखनौचा पालापाचोळा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा… इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक पॅरीडी साँग्ज गायल्याने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या खार येथील स्टुडिओ सोमवारी सायंकाळी शिवसैनिकांनी...
IPL 2025 – चौकार अन् षटकारांच्या आतषबाजीत पंजाबचा विजयी धमाका, गुजरात पराभूत
सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक, व्हिडीओ व्हायरल
राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, बी एच पालवे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
विहिरीच्या खोदकामादरम्यान भीषण अपघात, दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
वर्गात बडबड करत होती म्हणून पाचवीच्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, शिक्षिकेवर गुन्हा दाखल
खेड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, कोकण रेल्वे ठप्प; दीड तासांनी वाहतूक सुरळीत