खासदारांची झाली पगारवाढ! भत्ता आणि पेन्शनही वाढले
खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांनी नेमके किती वेतन मिळते. याबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता असते. आता खासदारांच्या वेतनात, भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच माजी खासदारांचे पेन्शही वाढले आहे. खासदारांना सध्या महिन्याला एक लाख रुपये वेतन मिळते, ज्यामध्ये वाढ होऊन आता ते १ लाख २४ हजार रुपये केले गेले आहे.
खासदारांना मिळणारा दैनिक भत्ताही दोन हजार रुपयांवरून वाढवून आता तो अडीच हजार रुपये करण्यात आला आहे. तर माजी खासदारांची मासिक पेन्शन 25 हजार रुपयांवरून वाढवून 31 हजार रुपये करण्यात आली आहे. हे सुधारीत वेतन आणि पेन्शन 1 एप्रिल 2023 पासून लागू असेल. सरकारने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. याआधी खासदारांचे वेतन आणि भत्ते एप्रिल 2018 मध्ये वाढवण्यात आले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List