Vasai News – सावत्र बापाकडून सतत लैंगिक छळ, पीडित तरुणीने नराधमाचे गुप्तांगच छाटले
नालासोपाऱ्यात सोमवारी दुपारी एक खळबळजनक घटना घडली आहे. सावत्र बापाच्या सततच्या लैंगिक छळाला कंटाळून 24 वर्षीय तरुणीने त्याचे गुप्तांग छाटले. यानंतर नराधम बापावर चाकूने वारही केले. या घटनेत नराधम बाप गंभीर झाला असून त्याच्यावर मुंबईतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रमेश भारती असे नराधमाचे नाव आहे. तुळींज पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या आईने आरोपी रमेश भारतीसोबत दुसरे लग्न केले होते. त्यानंतर त्या आरोपीसोबत नालासोपारा येथील संतोषभुवन येथील चाळीत राहतात. गेल्या दोन वर्षांपासून रमेश सावत्र मुलीचा लैंगिक छळ करत होता. सोमवारीही त्याने तिच्यावर शरीरसंबंधासाठी तरुणीवर दबाव टाकला.
आरोपीच्या छळाला कंटाळलेल्या तरुणीने अखेर त्याचा काटा काढण्याचे ठरवले. हे करण्यासाठी मला लाज वाटते सांगून तिने बापाच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर चाकू हल्ला करत बापाचे गुप्तांग छाटले. रक्ताच्या थारोळ्यात आरोपी घराबाहेर पळाला. मात्र तरुणीने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर चाकूने वार केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List