रत्नागिरीत गोगलगायच्या नवीन प्रजातीचा शोध, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधन

रत्नागिरीत गोगलगायच्या नवीन प्रजातीचा शोध, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधन

कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम घाटातील जंगलामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंंडेशनच्या संशोधकांनी गोगलगायच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. रत्नागिरी जिह्यातील अनसुरे गावाजवळ असलेल्या देव गिरेश्वर मंदिराच्या बाजूला असणाऱ्या झाडीत ओलसर पालापाचोळ्यात ही प्रजाती आढळून आली. ‘थिओबालडियस काेंकणेंसिस’ असे नव्या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. गोगलगायची नवीन प्रजाती तिच्या शंख व शंखाच्या झाकणावरच्या काही महत्त्वाच्या वैशिष्टय़ांमुळे तिला वेगळ्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. नव्या प्रजातीच्या शंखाची रचना, लांबी, रुंदी, शंखाच्या तोंडाजवळ असलेली विशिष्ट प्रकारची खाचेची उठावदार कडा आणि शंखाच्या झाकणावर असलेल्या छोट्या काट्यांसारख्या रचना ही वैशिष्ट्ये पश्चिम घाटात आढळणाऱ्या थिओबालडियस ट्रिस्टीस या प्रजातीपेक्षा वेगळी आहेत.

थिओबालडियस काेंकणेंसिस

ही गोगलगाय रत्नागिरीत देव गिरेश्वर मंदिर (अनसुरे), उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान (चिखली, चिपळूण-गुहागर रस्ता), केशरनाथ विष्णू मंदिर (शेडवई) तसेच रायगड जिह्यात फणसाड अभयारण्य येथे आढळली आहे. या गोगलगाई समुद्रसपाटीपासून 80 ते 240 मीटर उंचीवरील सदाहरित व निमसदाहरित जंगलांमध्ये आढळतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाची दखल

नवीन प्रजातीवर मोलुस्कन रिसर्च या न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. शोधनिबंधाचे लेखक, दहिवडी कॉलेजचे संशोधक प्रा. डॉ. अमृत भोसले, ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे व अक्षय खांडेकर, मेढा येतील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ओमकार यादव, नॅचरल हिस्ट्री म्युझियम लंडनचे संशोधक डॉ. टॉम व्हाइट आणि श्रीलंकेतील राजराता विद्यापीठाच्या संशोधिका डॉ. दिनारझार्दे रहीम या सर्व संशोधकांच्या प्रयत्नातून संशोधन करण्यात आले आहे.

कोकणच्या जंगलांमध्ये आढळणाऱ्या अनेक गोगलगाय प्रजाती स्थानिक आहेत. त्या जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत. ही प्रजातीही कोकणच्या निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. तिचे संवर्धनासाठी महत्त्वाचे आहे.- तेजस ठाकरे, प्रमुख संशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक; 3 दहशतवादी ठार तर, 3 जवानही शहीद जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक; 3 दहशतवादी ठार तर, 3 जवानही शहीद
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये गुरुवारी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. तर दहशतवाद्याचा खात्मा...
IPL 2025 – मिचेल मार्श आणि निकोलस पुरनचा वादळी धमाका, लखनऊचा हैदराबादवर 5 विकेटने विजय
मंत्रालयात प्रवेशासाठी अत्याधुनिक प्रणाली, आता मंत्रालयात जाताना अवलंबन करावी लागणार ही पद्धत
‘…तर आदित्य ठाकरे यांची देखील नार्को टेस्ट करायला पाहिजे’; दिशा सालियन प्रकरणात कदमांची मोठी मागणी
India Tour Of England- इंग्लंड दौऱ्यातून रोहित शर्मा आऊट? विराट कोहलीही मुकण्याची शक्यता
श्रीलंकेच्या नौदलाने 11 हिंदुस्थानी मच्छिमारांना केली अटक, बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याचा आरोप
Nanded News – गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन, काय आहे प्रकरण?